Marathi News> विश्व
Advertisement

...अन् 47 सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेलं! बघा पुराचा भयावह Video Viral

Heavy Rain Video: मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये प्रचंड हाहाकार माजला आहे. डझनभर घरे कोसळली आहेत  तर अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. बेपत्ता लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे. हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिला आहे.  

...अन् 47 सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेलं! बघा पुराचा भयावह Video Viral

Devastation Due Heavy Rain Video Viral: भारतात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. त्यासोबत चीनमध्येही अशीच परिस्थिती आहे. तिथे अनेक ठिकाणी प्रलय आला आहे. चीनचा अनेक भागात बिकट परस्थिती निर्माण झाली आहे.  चीनच्या सिचुआन प्रांतात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आला. तिथे मडफ्लो अर्थात चिखलयुक्त भूस्खलनने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर सध्या याचाच एक भयावह व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये अवघ्या 47 सेकंदात एक पूर्ण गाव पाण्याच्या लाटांमध्ये गायब होताना दिसत आहे. या दुर्घटनेने संपूर्ण प्रांतात हाहाकार माजवला आहे.

अनेक घरे जमीनदोस्त 

विशेषतः याएन आणि मेइशान या भागांमध्ये पूर आणि चिखलाच्या लोंढ्यांमुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेक नागरिक बेपत्ता आहेत, तर शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले आहे. रस्ते पूर्णपणे मलब्याखाली गेले आहेत, त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय सतत पाऊसही सुरु आहे. काही पुलं वाहून गेल्याने आणि विद्युत व पाणीपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.

हे ही वाचा: चंद्राच्या पार झेपावली 'अंतरिक्ष रेल्वे', जादुई अनुभव देणारा हा Viral Video एकदा बघाच!

 

युद्धपातळीवर मदतकार्य सुरू

स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. मदतकार्यांसाठी शेकडो बचावकर्मी, ड्रोन, आणि शोधी कुत्र्यांचा वापर केला जात आहे. मात्र हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, त्यामुळे आणखी पूर व मडफ्लो होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

हे ही वाचा: Video: सामना जिंकल्यावर कर्णधार शुभमन गिल घेतोय 'या' व्यक्तीचा शोध, कोण हरवलं आहे? जाणून घ्या

 

का होतंय असं? 

हवामान तज्ञांचे म्हणणे आहे की, या भागात बिनधास्त बांधकामं व हवामान बदलाच्या प्रभावामुळे भौगोलिक समतोल बिघडला आहे, ज्यामुळे भूस्खलन आणि पूर वारंवार होऊ लागले आहेत. या संपूर्ण घटनेत सुदैवाने अनेक जण वेळीच बाहेर काढण्यात यश आले असले तरी जीवितहानीची भीती अद्याप टळलेली नाही.

हे ही वाचा: Fact Check: हार्दिकच्या पंड्याच्या घरी पुन्हा गेली नताशा? Viral Video मागचं सत्य नक्की काय आहे? जाणून घ्या

 

पुनर्वसनासाठी विशेष निधी 

दरम्यान, सरकारने पुनर्वसनासाठी विशेष निधी जाहीर केला असून, पूरग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. सोशल मीडियावर पसरलेले अनेक व्हिडीओ या आपत्तीची तीव्रता दाखवतात. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित भागात हलवण्याचं आवाहन केलं आहे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याची विनंती केली आहे.

Read More