Marathi News> विश्व
Advertisement

ही एलियनच्या घराची वाट की सूर्याची मेणबत्ती? बर्फाळ डोंगरातील हे दृश्य विज्ञानाला शह देणारं

Viral Photo : जवळून व्यवस्थित पाहिल्या हे दृश्य नेमकं कसं आहे हे लक्षात येतं. पण, त्यासंदर्भातील नेमकी माहिती थक्क करणारी आहे हेसुद्धा खरं.   

ही एलियनच्या घराची वाट की सूर्याची मेणबत्ती? बर्फाळ डोंगरातील हे दृश्य विज्ञानाला शह देणारं

Viral Photo : एलियन अस्तित्वात आहेत की नाहीत? इथपासून हे एलियन नेमकं कुठे वावरतात, ते अस्तित्वात असतील तर नेमके कोणत्या ग्रहांवर आहेत इथपर्यंतचे प्रश्न अनेकांच्याच मनात घर करतात. अशा या एलियनविषयी साऱ्या जगाला कुतूहल असतानाच संशोधक बहुविध तऱ्हांनी त्यांच्याविषयीची सखोल माहिती मिळवण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्याचदरम्यान, आता एक असं दृश्य, किंबहुना एक अशी रचना समोर आली आहे की अनेकांनीच या दृश्याचा उल्लेख एलियनच्या घराकडे जाणारी वाट असा केला आहे. 

ऑस्ट्रीया इथं एका स्की करणाऱ्या व्यक्तीनं अर्थात स्कीअरनं हे दृश्य टीपलं आणि त्याची एकमेवाद्वितीय झलक सोशल मीडियावर शेअरही केली. हे दृश्य पाहताक्षणी एखाद्या यानाच्या आकारंच दिसत असून, अवकाशाच्या दिशेनं झेपावणारं असतानाही ते नेमकं काय आहे याचाही उलगडा त्यानं तेला. 

सूर्याची मेणबत्ती या नावानं ही रचना ओळखली जाते असं सांगत ही एक अद्वितीय नैसर्गिक घटना असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. 10 डिसेंबर 2024 रोजी वेल्ट वाइल्डर कॅसर, ब्रिक्सेंटल इथं ही घटना घडली. जिथं स्कीअरनं व्हायरलहॉगवर या घटनेचा व्हिडीओसुद्धा शेअर केला. ही घटना पाहता त्या क्षणी काहीच सुचेनासं झालं होतं असं सांगत आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही असं काहीच न पाहिल्याची प्रतिक्रिया या स्कीअरनं दिली. 

प्रत्यक्षात ही आहे सूर्याची मेणबत्ती... 

सूर्याची मेणबत्ती ही रचना संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेली स्थिती असून, यामध्ये एक प्रकाशमान लंबवर्तुळाकार आकृती तयार होऊन ती जणू सूर्यातूनच तयार झाली आहे असं भासतं. 

हेसुद्धा वाचा : पृथ्वी फिरते ऐकलेलं, आता पाहूनही घ्या; दिवस- रात्रीचं चक्र 1.11 मिनिटांमध्ये, या Video कडे अजिबात दुर्लक्ष नको

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pubity (@pubity)

ही रचना तेव्हा तयार होते जेव्हा वातावरणात असणारे सूक्ष्म हिमकण सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊन एक लंबवर्तुळाकार किंवा दंडाकृती आकार तयार करतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा सूर्य क्षितीजाच्या अगदी खालच्या बिंदूवर स्थिरावतो तेव्हा ही अद्भूत रचना पाहायला मिळते. 

Read More