Marathi News> विश्व
Advertisement

रशियातल्या युद्धजन्य परिस्थितीतही त्यांचं लक्ष मुंबईत...

रशिया आणि युक्रेन यांच्यात गुरुवारपासून तुंबळ युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु असून दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झालंय. येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.  

रशियातल्या युद्धजन्य परिस्थितीतही त्यांचं लक्ष मुंबईत...

मॉस्को : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या अनेक सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. तर युक्रेनची अनेक शहरे रशियाच्या ताब्यात गेली आहेत. या युद्धाला विराम मिळावा म्हणून जागतिक पातळीवरून विविध मार्गांनी रशियावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

रशिया या युद्धात वेगवेगळ्या खेळी खेळत आहे. नागरिकांमध्ये भीती पसरलीय. पण, या भीतीच्या वातावरणातही रशियामध्ये MBBS चं शिक्षण घेणाऱ्या Northern state medical university मधील विद्यार्थ्यांचं लक्ष मात्र मुबंईत आहे.

MBBS चं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा दिलाय. रशियात युद्धजन्य परिस्थिती असली तरी आमचं लक्ष तिकडे आहे, असं या विद्यार्थ्यांनी म्हटलंय.

आमचे राजे तिथे उपाशीपोटी झोपत आहेत. आंदोलन करत आहे. आम्हला माफ करा राजे, तुमचे पूर्वज राजे शिवछत्रपती यांनी याआधी आम्हाला कधी उपाशीपोटी झोपू दिले नाही. पण, आज आमच्यासाठी तुम्हाला उपाशी झोपावं लागतंय, हे आमचं दुर्दैव आहे.

युद्धजन्य परिस्थितीत आम्ही रस्त्यावर आलो. संभाजीराजे यांच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तुम्हीही त्यांच्या मागे उभे रहायला पाहिजे. महाराष्ट्रातील मावळ्यांनो राजेंसाठी बाहेर पडा.. अशी साद या MBBS च्या विद्यार्थ्यांनी घातलीय.  

Read More