Marathi News> विश्व
Advertisement

Viral News: ...अन् प्रेक्षकांनी मैदानात Soft Toys चा खच पाडला, कारण समजल्यानंतर डोळ्यात पाणी येईल; पाहा VIDEO

Soft Toys For Turkey Earthquake Affected Children: इस्तंबूल येथे तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्त (Turkey Syria Earthquake) लहान मुलांना आम्ही तुमच्यासोबत आहोत असा संदेश देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. यासाठी फुटबॉल सामना सुरु असताना प्रेक्षकांनी मैदानात सॉफ्ट टॉइज (Soft Toys) फेकत आपला पाठिंबा दर्शवला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाले आहेत.     

Viral News: ...अन् प्रेक्षकांनी मैदानात Soft Toys चा खच पाडला, कारण समजल्यानंतर डोळ्यात पाणी येईल; पाहा VIDEO

Soft Toys For Turkey Eartquake Affected Children: इस्तंबूल (Istanbul) येथे फुटबॉल सामना सुरु असतानाच प्रेक्षकांनी मैदानात अचानक सॉफ्ट टॉइज (Soft Toys) फेकण्यास सुरुवात केली. यानंतर मैदानात अक्षरश: खच पडला होता. आता हे नेमकं कशासाठी झालं असावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण यामागे एक भावनिक कारण आहे. तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्त (Turkey Syria Earthqauke) लहान मुलांना संदेश पाठवण्यासाठी ही खेळणी हे बाहुले मैदानात फेकण्यात आले. 

तुर्कीश सुपर लीगमध्ये रविवारी Besiktas आणि Antalyaspor यांच्यात सामना सुरु होता. वोडाफोन पार्क स्टेडिअममध्ये हा सामना सुरु असतानाच प्रेक्षकांनी मोठे टेडी बेअर तसंच इतर बाहुले मैदानात फेकण्यास सुरुवात केली. यानंतर काही काळासाठी खेळही थांबला होता. सोशल मीडियावर अनेकांनी #BuOyuncakSanaArkadasım हा हॅशटॅग सुरु केला होता. याचा अर्थ "माझ्या मित्रा, हे खेळणं तुझ्यासाठी आहे'. मैदानातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

जवळपास 42 हजार प्रेक्षकांची क्षमता असणाऱ्या या स्टेडिअममध्ये प्रेक्षक सामन्यापूर्वी हातात रंगीबेरंगी बाहुल्या घेऊन बसल्याचं दिसत आहे. सामन्यात संगीत सुरु होताच प्रेक्षक आपल्या हातातील ही खेळणी मैदानाच्या दिशेने फेकू लागतात. मैदानात अक्षरश: खेळण्यांचा पाऊस सुरु झाला होता. 4 मिनिटं 17 सेकंद प्रेक्षकांकडून बाहुल्यांचं हे एका प्रकारचं दान सुरु होतं. 4 मिनिटं 17 सेकंदच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागेही भूकंपाचं कारण आहे. तुर्कीत आलेला भूकंपाचा पहिला झटका पहाटे 4 वाजून 17 मिनिटाला जाणवला होता. 

मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून अनेकजण हे पाहून भावूक झाले आहेत. या बाहुल्यांमुळे भूकंपग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर आनंद येईल अशी आशा व्यक्त होत आहे. 

तुर्की आणि सीरियात दोन शक्तिशाली भूकंपांमुळे 47 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 6 फेब्रुवारी 7.8 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपानी देशाला उद्ध्व्सत केलं आहे. या भूकंपात 93 हजारांहून अधिक इमारती कोसळल्या किंवा नुकसानग्रस्त झाल्या आहेत. इमारती कोसळून खाली अडकल्याने हजारो लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुर्कीमध्ये आगामी दशकातील ही सर्वात मोठी दुर्घटना असून शेकडो लोकांच्या डोक्यावरील छत हिरावलं आहे. यामुळे अनेक लोक कार, रस्ता, तंबू जिथे मिळेल तिथे वास्तव्य करत आहेत. 

fallbacks

दरम्यान, तुर्की भूकंपातून सावरत असतानाच सोमवारी 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप जाणवला. या भूकंपात एका व्यक्तीने आपला जीम गमावला असून, डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे सरकार ज्यप्रकारे स्थिती हाताळत आहे त्यावरुन टीका होत आहे. प्रशासनाकडून फार धीम्या गतीने बचावकार्य सुरु असल्याची टीका होत आहे. देशात आतापर्यंत इतक्या वेळा भूकंप आल्यानंतरही सरकारकडून अद्याप कोणतीही योजना आखण्यात आली नसल्याने टीका होत आहे. रविवारी फुटबॉल सामन्यातही याचे पडसाद उमटले. सरकारने पायउतार व्हावं अशा घोषणा मैदानात प्रेक्षकांकडून देण्यात आल्या. 

fallbacks

Besiktas football club ने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या खेळण्यांमुळे मुलांचं मनोबल वाढण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. "Toyzz Shop" शी हातमिळवणी करत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता अशी माहिती क्लबने दिली आहे. ही खेळणी विकून त्यातून येणारे पैसे भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी दिले जातील असं त्यांनी सांगितलं आहे. 

Read More