Marathi News> विश्व
Advertisement

स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाकडून मुलाच्या जीवाशी खेळ, तोंडात सिगरेट टाकली आणि...

जे करण्याचा कोणताही बाप विचार करणार नाही असंच कृत्य या निर्दयी बापानं केलं.

स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाकडून मुलाच्या जीवाशी खेळ, तोंडात सिगरेट टाकली आणि...

मुंबई : वडील आणि मुलाचे नाते हे मित्राचं नातं असतं. असं म्हणतात की, वडिल हे मुलाचे पहिले मित्र असतात. आपण हे बऱ्याचदा पाहिलं आहे की, आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी वडील आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. तसेच आपल्या मुलाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. परंतु हेच वडील आपल्या मुलाच्या जीवावर उठले तर? एक अशी बातमी समोर आली आहे, जी अंगावर काटा आणणारी आहे. कारण एका वडीलांनी आपल्या मुलासोबत असा काही प्रकार केला आहे. ज्याचा आपण स्वप्नात सुद्धा विचार करु शकत नाही.

इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाचा मुलाच्या जीवाशी खेळ

'द सन'च्या वृत्तानुसार, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या बापाने आपल्या मुलाच्या जीवाची पर्वा केली नाही. खरंतर, आपली विचित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी या बापाने आधी आपल्या मुलाच्या तोंडात सिगारेट ठेवली आणि नंतर तिला बंदुकीने जळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच या व्यक्तीने लांबून गोळी मारून मुलाच्या तोंडातील सिगारेट जळवण्याचा प्रयत्न केला.

विचार करा की, जरा जरी या व्यक्तीचं टार्गेट चुकलं असतं किंवा नेम इकडे तिकडे झाला असता, तर या मुलाला आपले प्राण गमवावे लागू शकले असते.

जे करण्याचा कोणताही बाप विचार करणार नाही असंच कृत्य या निर्दयी बापानं केलं, ज्यामुळे ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

fallbacks

खरंतर हा व्हिडीओ इराकमधील आहे. अद्याप मुलगा आणि वडिलांची ओळख पटलेली नाही. पित्याने आधी आपल्या मुलाच्या तोंडात सिगारेट टाकल्याचे चित्रात दिसत आहे. यानंतर दूर बसून त्याने एका बंदुकीने सिगारेटला टार्गेट केलं आहे. वडिलांची सूचना मिळताच मुलगा सिगारेट दातात अडकवून आकाशाकडे पाहात उभा राहिला.

यानंतर, थोडे अंतर गेल्यावर वडील जमिनीवर बसले आणि त्यांनी रायफल घेऊन मुलाच्या दिशेने निशाणा साधला आणि गोळीने तोंडात ठेवलेली सिगारेट जाळली. नशिबानं या घटनेत या मुलाला काहीही झालेलं नाही. तो लहान मुलगा सुखरुप आहे.

परंतु त्या गोळीचा आवाज इतका होता, ती त्या आवाजाने तो मुलगा घाबरला आणि थरथर कापू लागला.यानंतर हा मुलगा तोंडातून सिगारेट काढतो आणि वडिलांनी योग्य निशाणा मारल्याचे कॅमेऱ्यात दाखवतो. त्याच वेळी, वडील देखील व्हिडिओमध्ये त्याच्या क्षमतेबद्दल बोलताना दिसत आहेत.

Read More