Marathi News> विश्व
Advertisement

बर्गर ऑर्डर करताय तर सावधान! चिकन बर्गर खाताना आढळून आला हा भयानक प्रकार

South Africa Restaurant: दक्षिण आफ्रिकेतील मपुमलांगा प्रांतातील सेकुंडा शहरात असलेल्या जगप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने रेस्टॉरंटवर आरोप केला की त्याने ऑर्डर केलेल्या बर्गरमधून एक भयानक घाणेरडी गोष्ट बाहेर आली.

बर्गर ऑर्डर करताय तर सावधान! चिकन बर्गर खाताना आढळून आला हा भयानक प्रकार

नवी दिल्ली : Frog in Restaurant Burger: आपण एखाद्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये बाहेर जेवायला गेलो तर, आवडीचे पदार्थ ऑर्डर करतो परंतू जेवणात अचानक एखादी घाणेरडी गोष्ट आढळून आली तर सहाजिकच तुमचा संताप अनावर होईल. अशीच एक घटना दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळाली

अन्नात सापडला बेडूक

'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, एका संतापलेल्या व्यक्तीने दावा केला आहे की, त्यांच्या मुलीच्या बर्गरमध्ये एक मेलेला बेडूक आढळून आला. दक्षिण आफ्रिकेतील मपुमलांगा प्रांतातील सिकुंदा शहरात असलेल्या जगप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला.

फादर बेझुइडेनहाउट म्हणाले की त्यांनी त्यांच्या मुलीसाठी चिकन बर्गर विकत घेतला आणि तो खाताना मुलीला त्यात एक मेलेला बेडूक सापडला. 

त्यांनी ही घटना आणि बर्गचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या पोस्टमध्ये लिहले की, माझ्या मुलीसाठी खरेदी केलेल्या बर्गरमध्ये ही गोष्ट आढळून आली आहे. परंतू तक्रारीनंतरही प्रतिसाद न दिल्याबद्दल रेस्टॉरंटचे आभार. 

रेस्टॉरंटची प्रतिक्रिया

त्‍याच्‍या शेअरच्‍या पोस्‍टवर 1 हजारांहून अधिक कमेंटस् आल्या आणि अनेकांनी ती शेअरही केली. वडिलांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंटने म्हटले की, ते प्रकरण गांभीर्याने घेत आहेत आणि स्टोअरची देखील चौकशी करणार आहेत.

Read More