Marathi News> विश्व
Advertisement

जाळ्यात सापडला मनुष्याच्या चेहऱ्याचा मासा; गुदगू्ल्या केल्याने हसरा होतोय चेहरा

अमेरिकेच्या मैसाचुसेट्समधील काही फोटो सोशलमीडियावर अचानक व्हायरल होत आहेत.

जाळ्यात सापडला मनुष्याच्या चेहऱ्याचा मासा; गुदगू्ल्या केल्याने हसरा होतोय चेहरा

वॉशिंगटन : अमेरिकेच्या मैसाचुसेट्समधील काही फोटो सोशलमीडियावर अचानक व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हसणारा मासा दिसतोय. हा मासा एका मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला होता.

जेफरी दादर नावाच्या मच्छिमाराला वेगळ्याच प्रकारची मासा हाती लागला. सुरूवातील पाहताच मच्छिमार हैराण झाला. मच्छिमाराने या माशाचा लगेच व्हिडिओ बनवला. या माशाच्या पोटात गुदगुल्या केल्याने तो ठुमके मारत हसत असल्याचे व्हिडिओत दिसतंय. या माशाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या माशाला स्केट मासा (Skate Fish)असे म्हटले जाते. जेफरी ने केप कॉड बेच्या परिसरात या माशाला पकडले होते. माशाचा हसतानाचा व्हिडिओ देखील मच्छीमाराने पोस्ट केला आहे. 

परंतु सोशल मीडियावर या माशाला काही युजर्स क्युट आणि छान अशी प्रतिक्रिया देत आहेत. तर काही जण हा मासा विचित्र आणि भीतीदायक असल्याचे म्हणत आहेत.

खरे तर जे लोक माशाचा डोळा समजत आहे. तो त्याच्या नाकाचा भाग आहे. ज्याला तोंड समजत आहे ते गिल्स आहेत.

Read More