Plane Stuck in the Sky: स्वित्झर्लंडहून ग्रीसकडे जाणारी एक प्रवासी विमान खराब वादळी हवामानामुळे आकाशातच अडकले. अवघ्या काही तासांची फ्लाइट 32 तासांची झाली पण ती ठरलेल्या लोकेशनवर पोह्चलीस नाही. फ्लाइटव्ह उड्डाण अखेर 32 तासांचं धक्कादायक अनुभवात रूपांतरित झालं. या 32 तासात 137 प्रवाशांच्या श्वासात श्वास अडकला होता. शेवटी, अनेक वेळा मार्ग बदलून आणि इंधन भरूनही विमान ग्रीसमध्ये लँड करू शकलं नाही. अखेरीस ज्या ठिकाणाहून फ्लाइटने उड्डाण केलं होतं, तिथेच विमानाला परत आणावं लागलं.
ही घटना 24 मे रोजी घडली. कोंडोर एअरलाईन्सची फ्लाइट DE1234 झ्युरिच (स्वित्झर्लंड) येथून ग्रीसच्या क्रेते बेटावरील हेराक्लिओन शहरासाठी रवाना झाली होती. फ्लाइटला उड्डाण करायला थोडा म्हणजे 30 मिनिटे झाले. सुरुवातीला प्रवास सुरळीत होता. मात्र, ग्रीसच्या हद्दीत आल्यानंतर हवामान एकदम बिघडू लागलं.
हे ही वाचा: GK: एक लिटर डिझेलमध्ये किती किलोमीटर धावते ट्रेन? इंजिनचं मायलेज ऐकून थक्क व्हाल!
पायलटने हवामान पाहून विमानाचा मार्ग वळवण्याचा प्रयत्न केला. पण याचा काहीच फायदा झाला नाही. पायलटला काळे ढग, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट यामुळे कोणताही पर्यायी मार्ग सुरक्षित वाटत नव्हता. विमान हवेत हेलकावत होतं आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.फ्लाइटमधलं इंधन झपाट्याने कमी होऊ लागल्याने पायलटला तीन तासांच्या प्रयत्नांनंतर एथेंस एअरपोर्टवर तात्पुरतं लँडिंग करावं लागलं.
इंधन भरल्यानंतर विमानाने पुन्हा एकदा ठरलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, पण याचा काहीच फायदा नाही झाला. परिणामी, पायलटने विमान थेसालोनिकी या ग्रीक बेटावर वळवलं, जिथे प्रवाशांनी काही तास विश्रांती घेतली. तोपर्यंत विमान झ्युरिचहून उड्डाण केल्यानंतर 11 तास हवेत होतं.
हे ही वाचा: भारतातील 'या' गावाला म्हणतात 'विधवांचे गाव'! तरुणपणीच नवऱ्याचे होते निधन, काय आहे कारण?
पुढील दिवशी, पुन्हा हेराक्लिओनसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, वाऱ्याचा जोर तसाच कायम असल्याने विमान पुन्हा एकदा मार्ग बदलत एथेंसकडे वळवावं लागलं. तेथून शेवटी निर्णय घेण्यात आला की विमान थेट झ्युरिचकडे परत घेऊन जावं. परिणामी, 32 तास हवेत भटकलेल्या या फ्लाइटने पुन्हा झ्युरिचमध्ये लँड केलं. इथूनच सुरुवातीला उड्डाण करण्यात आलं होतं.
हे ही वाचा: अंतराळातून दिसला ऑरोरा लाईट्सचा अद्भुत नजारा! NASA अंतराळवीर जोनी किमने टिपला मंत्रमुग्ध करणारा Video
कोंडोर एअरलाईन्सने नंतर यावर स्पष्टीकरण दिलं की, "हेराक्लिओन एअरपोर्टवर सतत खराब हवामान आणि जोरदार वाऱ्यांमुळे टेकऑफ आणि लँडिंग अतिशय मर्यादित स्वरूपात शक्य होतं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही विमान परत झ्युरिचला नेण्याचा निर्णय घेतला."