Marathi News> विश्व
Advertisement

बघा कसा गोठलाय नायगारा धबधबा...

नायगारा धबधब्याचं रुपांतर एखाद्या परिकथेतल्या बर्फाळ स्वप्ननगरीत झालंय.

बघा कसा गोठलाय नायगारा धबधबा...

नायगारा फॉल्स : नायगारा धबधब्याचं रुपांतर एखाद्या परिकथेतल्या बर्फाळ स्वप्ननगरीत झालंय.

बर्फाची नगरी

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय नायगारा धबधबा गोठलाय.
नायगाराचं पाणी जिथे जिथे स्पर्श करतं ती झाडं, रस्ते, शिखरं आणि सभोवतालचा सर्व परिसर गोठून गेलाय. त्या परिसरात सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. स्वप्नवत बर्फाळनगरी निर्माण झाली आहे.fallbacks

तापमान शून्याखाली

अमेरिकेच्या बहुतांश पूर्व भागात प्रचंड थंडी पडली आहे. त्यामुळे तिथे सगळीकडे बर्फाचंच साम्राज्य निर्माण झालं आहे. नायगारासुद्धा त्याला अपवाद नाही. किंबहुना नायगारा धबधबाच गोठल्यामुळे त्या परिसरात सर्वत्र बर्फाचंच साम्राज्य आहे. धबधबाच गोठल्यामुळे एक अद्भूत असं विहंगम दृश्य निर्माण झालंय.

पर्यटकांची पंढरी

पर्यटकांसाठी तर गोठलेला नायगारा म्हणजे मोठीच पर्वणी ठरलीय. एरवी धो धो पडणारा पाण्याचा प्रचंड प्रपात गोठून बर्फ झाल्याचा बघण्याचा आनंद पर्यटक घेतायेत. हे असामान्य दृश्य बघण्यासाठी जगभरातून लोक हजेरी लावता आहेत.

Read More