Marathi News> विश्व
Advertisement

Mobile चोराच्याच प्रेमात पडली तरुणी! लव्हस्टोरी ऐकून मुलाखतकार चक्रावला; पाहा Video

Girl In Love With Mobile Thief: फोन चोरल्यानंतर फोनमध्ये असलेले या तरुणीचे फोटो पाहून हा चोर तिच्या प्रेमात पडला. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे दोघे मागील 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची मुलाखत व्हायरल झाली आहे.

Mobile चोराच्याच प्रेमात पडली तरुणी! लव्हस्टोरी ऐकून मुलाखतकार चक्रावला; पाहा Video

Girl In Love With Mobile Thief: सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याची अजब प्रेमकथा व्हायरल होताना दिसत आहे. ही प्रेमकथा वाचल्यानंतर तिला अजब का म्हटलं आहे याचा प्रयत्य तुम्हाला येईल. एक तरुणी अशा तरुणाच्या प्रेमात पडली ज्याने तिचा मोबाईल चोरला होता. म्हणजेच या मुलीचा जीव एका मोबाईल चोरावर जडला. या मुलीनेच एका मुलाखतीमध्ये आपल्या प्रेमाची कबुली देत नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

लव्हस्टोरीबद्दल तरुणी काय म्हणाली?

ट्वीटरवरील मिल्टननोविस नावाच्या हॅण्डलवरुन या ब्राझीलमधील जोडप्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुलाखतकार व्यक्ती इमॅन्युएल नावाच्या तरुणीला, तू तुझ्या प्रियकराला कधी, कुठे आणि कशी भेटलीस? असा प्रश्न विचारला. इमॅन्युएलने या प्रश्नाला फारच रंजक उत्तर दिलं. "एकदा मी रस्त्यावरुन जात असताना. तो माझा मोबाईल घेऊन पळून गेला. मात्र नंतर तोच माझा मोबाईल परत करण्यासाठी आला. त्याचा प्रमाणिकपणा पाहून मी फार प्रभावित झाले," असं इमॅन्युएलने सांगितलं. 

फोटो पाहिले अन् फोन परत करण्याचं ठरवलं

इमॅन्युएलच्या प्रियकराने त्या घटनेबद्दल बोलताना, "तेव्हा मी फार कठीण परिस्थितीचा सामना करत होतो म्हणून मी चोरी केली. खरं तर मला कोणतीही मैत्रीण नाही. या मुलीचा फोन चोरल्यानंतर फोनवर तिचे फोटो पाहिल्यानंतर मी तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडलो. त्यानंतरच मी तिला फोन परत करण्याचा निर्णय घेतला," असं सांगितलं.

फोन आणि हृदय दोन्ही गोष्टी चोरल्या

'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, "मला फोन परत करताना वाईट वाटलं. मात्र मी स्वत:ची समजूत घालताना, अशी सुंदर मुलगी रोज भेटत नाही असं म्हणत  मोबाईल परत करण्याच्या निर्णयावर ठाम राहिलो. मी तिला मोबाईल परत केला आणि तिची माफी मागितली," असं या तरुणाने सांगितलं. हे ऐकून मुलाखत घेणाऱ्याने मस्करीमध्ये, "म्हणजे तू इमॅन्युएलचा फोन आणि हृदय दोन्ही गोष्टी चोरण्यात यशस्वी ठरलास?" असा प्रश्न विचारला. त्यावर या तरुणाने "नक्कीच, तुम्ही हवं तर तसं म्हणू शकता," असं हसत उत्तर दिलं.

2 वर्षांपासून करत आहेत डेट पण...

मागील दोन वर्षांपासून इमॅन्युएल आणि हा तरुण एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी अजूनही मुलीचे आई-वडील आपल्या मुलीचा जोडीदार एक 'चोर' असल्याची गोष्ट स्वीकारतील का याचं उत्तर दिलेलं नाही. तुम्हीच ऐका या दोघांची उत्तर आणि पाहा त्यांची व्हायरल मुलाखत...

कमेंट्सचा पाऊस

सोशल मीडियावर इमॅन्युएल आणि तिच्या प्रियकराची स्टोरी व्हायरल जाली आहे. या व्हिडीओला 2 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली असून प्रेम खरोखरच अंधळं असतं असं अनेकांनी म्हटलं आहे. एकाने तर हा प्रेक्षकांबरोबर केलेला प्रँक तर नाही ना अशीही शंका उपस्थित केली आहे. आता तरी या तरुणाने चोरी सोडली असेल अशी अपेक्षा, असं म्हटलं आहे. 

Read More