Marathi News> विश्व
Advertisement

Boyfriend ला केलेला फोन दुसऱ्या महिलेनं उचलला, Girlfriend नं केलं असं की...

US Viral Story: बॉयफ्रेंडला फोन केल्यानंतर दुसऱ्या महिलेनं फोन उचलल्यानं गर्लफ्रेंडला राग अनावर झाला. रागाच्या भरात बॉयफ्रेंडच्या थेट घर गाठलं आणि दिवाणखान्यातील सोफ्याला आग लावली. ही आग नंतर संपूर्ण घरात पसरली. 

Boyfriend ला केलेला फोन दुसऱ्या महिलेनं उचलला, Girlfriend नं केलं असं की...

Trending News: अमेरिकेच्या (America) टेक्सासमधून (Texas) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्षुल्लक कारणावरून गर्लफ्रेंडनं (Girlfriend) आपल्या बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) घराला आग (House Fire) लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. यानंतर पोलिसांनी 23 वर्षीय सीनॅडा मॅरी सोटो हीला अटक केली आहे. बेक्सर काउंटी शेरिफ कार्यालयाने ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोटोने आपल्या बॉयफ्रेंडला फोन केला होता. मात्र घरात उपस्थित एका महिलेनं हा फोन उचलला. त्यामुळे तिला राग अनावर झाला. 23 वर्षीय सीनॅडा मॅर सोटो रात्री 2 च्या सुमार बॉयफ्रेंडच्या घरी गेली जाऊन मौल्यवान सामानाची चोरी केली. तसेच लिविंग रुममधील सोफ्याला आग लावल्याने घरात पसरली. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर सीनॅडा सोटोनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दुसरीकडे, घरातील ती महिला त्याची नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. 'घराला आग लागली तेव्हा ती एक व्हिडिओ बनवत होती, ज्यामध्ये महिलेचे कृत्य रेकॉर्ड करण्यात आले होते. तिने सोफ्याला आग लावली आणि आग संपूर्ण घरात पसरली. यामुळे 50 हजार डॉलरचे नुकसान झाले आहे.'

बातमी वाचा- Plane Crash: विमान अपघात झाल्यानंतर थोडक्यात वाचलं जोडपं, पण Selfie घेतल्यानं...

KSAT डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, सोटोने आपल्या बॉयफ्रेंडला फेसटाइम केला होता आणि घरातील जळलेला सोफा दाखवला होता. त्याचबरोबर संवाद साधत म्हणाली होती की, "मला आशा आहे की, तुझं सामान व्यवस्थित असेल." त्यानंतर तिने फोन कापला होता. फायर मार्शलच्या कार्यालयाने BCSO ला जाळपोळीच्या तपासात मदत केली आणि BCSO ने सोटोच्या अटकेसाठी दोन वॉरंट जारी केले. सोटोला सोमवारी पहाटे अडीच वाजता अटक करण्यात आली.

Read More