Marathi News> विश्व
Advertisement

GK : सोन्याच्या खाणींवर वसलेलं असं कोणतं शहर जे अवकाशाच्याही सर्वात जवळ आहे?

World News : जगाच्या पाठीवर असणारं प्रत्येक शहर अतिशय खास असून, काही शहरं तर त्यांच्या वेगळेपणामुळं कमालीची चर्चेत असतात असंच जगातील हे एक शहर आहे जे चक्क सोन्याच्या खाणींनी वेढलं आहे....   

GK : सोन्याच्या खाणींवर वसलेलं असं कोणतं शहर जे अवकाशाच्याही सर्वात जवळ आहे?

World News : जगाच्या पाठीवर असणारे कैक देश आणि त्या देशांमध्ये असणारी कैक शहरं चर्चेचा विषय ठरतात आणि अनेकदा या शहरांचं वेगळेपणच त्यांना चर्चांना केंद्रस्थानी आणण्यास कारणीभूत ठरतं. सध्या याच शहरांच्या यादीतून एक नाव पुढे येत असून, या शहराचा संबंध थेट अवकाशाशी जोडला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे शहर चक्क अवकाशापासून पृथ्वीवरील सर्वात जवळचं शहर आहे. 

कुठं आहे हे शहर? या शहराचं नाव काय? 

जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या या शहराचं नाव आहे, 'ला रिनाकोलाडा'. समुद्रसपाटीपासून साधारण 16700 फूट इतक्या उंचीवर असणाऱ्या या शहराची आणखी एक ओळख म्हणजे, त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या सोन्याच्या खाणी आणि या शहराचं तिथं असणारं अस्तित्वं. राहिला मुद्दा या शहरातील नागरिकांच्या श्रीमंतीचा, तर इथलं वास्तव काही वेगळंच आहे. 

काय आहे या शहरांचं वास्तव? नेमक्या कुठे आहेत सोन्याच्या खाणी? 

डेली मेलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार  'ला रिनकोलाडा' या शहराभोवती आणि या शहराखाली सोन्याच्या खाणींचं अस्तित्वं असून, तिथून सोनं बाहेर काढल्यास या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख एका झटक्यात उंचावू शकतो असं म्हटलं जात आहे. 

कधीपासून अस्तित्वात आहे हे शहर? 

साधारण 20 व्या शतकामध्ये या शहराचं अस्तित्वं जगासमोर आलं. त्याचवेळी य़ा शहराखाली दडलेलं सोनं मिळालं तर आपण लगेचच श्रीमंत होऊ अशी येथील नागरिकांची धारणा होती. याच विचारानं अनेकांनी या शहराच्या दिशेनं कूच केली आणि असं करता करता शहराची एकूण लोकसंख्या 50 हजारांच्याही पुढे गेली. या लोकसंख्येमध्ये बहुतांशी मजदूर असून ते सोन्याच्याच खाणींमध्ये काम करतात असं म्हटलं जात आहे. इथ अनानिया मर्कल हे सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ असून, हा एक असा बिंदू आहे जिथं उभं राहिलं असता  पूर्ण पृथ्वीच आपल्या दृष्टीक्षेपात असल्याचा भास होतो. 

हेसुद्धा वाचा : Tamannaah Bhatia on virat kohli : विराटसोबतच्या अफेअरचा विषय निघताच तमन्नानं सगळं सांगितलं... लग्नाबद्दल म्हणाली... 

 

अवकाशापासून हे शहर किती दूर? 

सोन्याची खाणच नव्हे, तर या शहराचं अस्तित्वंच त्याचं वेगळेपण सिद्ध करतं. असं म्हणतात ला रिनकोलाडा हे शहर अवकाशापासून अतिशय जवळ आहे. त्याचं भौगोलिक स्थान यामागचं मुख्य कारण असून, इथं राहणं प्रचंड आव्हानात्मक असल्याचं म्हटलं जातं. शास्त्रज्ञांच्या मते या शहरांसारख्या ठिकाणांवर 24 तासांहून अधिक काळ सामान्यांना तग धकरता येत नाही. ही एक अतिशय विचित्र वस्ती असून, चहुबाजूंनी तिला पर्वतांचा वेढा असून, शहराकडे जाणारे रस्त्ये कचऱ्यानं तुडूंब भरले आहेत. येथील तापमान प्रचंड कमी असून तेथील पाण्यात पाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यानं येथील नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासल्याचं म्हटलं जातं. 

Read More