नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या(United Nations) अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO)मते, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये गव्हाचे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे मे महिन्यात सलग चौथ्या महिन्यात गव्हाचे भाव वाढले आहेत.
तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धासह हंगामी घटकांनी जगासमोर अन्नाचे संकट उभे केले आहे. सर्व देश प्रथम आपल्या गरजा पूर्ण करण्यावर भर देत आहेत. भारताने या कारणासाठी गव्हासह काही जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीवरही निर्बंध लादले आहेत.
मात्र, भारताच्या या निर्णयाचा जागतिक बाजारपेठेत विपरीत परिणाम झाला आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जागतिक स्तरावर गव्हाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत आणि विक्रमी उच्च पातळीच्या जवळ पोहोचल्या आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO)मते, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये गव्हाचे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे मे महिन्यात सलग चौथ्या महिन्यात गव्हाचे भाव वाढले आहेत. जागतिक गव्हाच्या किमती मे महिन्यात 5.6 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि सध्या गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत 56.2 टक्क्यांनी जास्त आहेत. मार्च 2008 च्या विक्रमी पातळीपेक्षा हे प्रमाण केवळ 11 टक्क्यांनी कमी आहे.