Viral News : सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे नेटकरी त्यांच्या आयुष्यातील अनुभव आणि व्हिडीओ, फोटो शेअर करतात. कधी कधी आयुष्यात असा घटना ही घडतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असतं. असाच काहीसा अनुभव एका महिलेला आला. जेव्हा एखाद्या महिलेला आपण आई होण्याची चाहुल लागते तेव्हा त्या बाळाची काळजी आईला घ्यावी लागते. अमेरिकेतील महिलेला एक विचित्र अनुभव आला. ही महिला 32 आठवड्यांनंतर तिची गर्भधारणा तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंडसाठी गेली होती. तेव्हा अल्ट्रासाऊंड नंतर समोर आलेले फोटो केवळ महिलेसाठी धक्कादायक नव्हते तर ते पाहून उपस्थितीत सर्वांनाच धक्का बसला होता.
अमेरिकेत राहणाऱ्या 33 वर्षीय अमांडा फोस्टरने जेव्हा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पाहिला तेव्हा तिला आश्चर्यचकित होणार आहे. अमांडाचा असा विश्वास आहे की, तिने तिच्या न जन्मलेल्या बाळाच्या डोक्यावर देवाचा हात पाहिला, तो त्याला प्रेम देत होता. महिलेने स्वतः हा फोटो शेअर केला आणि सोशल मीडियावर इतर लोकांना घटनेची माहिती दिली.
ती महिला म्हणाली, 'गरोदरपणाच्या सुरुवातीलाच तिच्या मुलाच्या हृदयात एक गंभीर आजार आढळून आला. डॉक्टरांनी सांगितले होते की हृदयाच्या त्या भागात जो महाधमनीजवळ आहे, त्यात समस्या आहे. शरीराला रक्तपुरवठा करण्याचे हे मुख्य माध्यम आहे. ही परिस्थिती घातक ठरू शकली असती. ही बातमी कळताच ती काळजीत पडली आणि देवाची प्रार्थना करू लागली. ती इतकी घाबरली होती की जेव्हा जेव्हा ती अल्ट्रासाऊंडसाठी जायची तेव्हा तेव्हा ती देवाला सर्व काही ठीक होण्यासाठी प्रार्थना करायची.
त्या महिलेने लिहिले, 'आम्ही आणि इतर अनेकांनी एकत्र खूप प्रार्थना केली. जेव्हा आम्ही एका तज्ज्ञाकडून त्याची पुन्हा तपासणी केली तेव्हा तो आजार पूर्णपणे नाहीसा झाला होता. अमांडा म्हणते की तिला तिच्या मुलाच्या अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये एक हात दिसला जो बाळाच्या डोक्याला स्पर्श करत होता. त्याच्या धाकट्या मुलीने प्रथम विचारले, 'हा कोणाचा हात आहे?' यानंतर तिच्या पतीनेही ते पाहिले आणि म्हटले की हा देवाचा हात असू शकतो जो त्यांच्या मुलाचे रक्षण करत आहे.
पण, महिलेने केलेल्या दाव्याबद्दल सोशल मीडिया वापरकर्त्यांचे मत वेगळे आहे. काही वापरकर्ते म्हणत आहेत की हा मुलाचा हात आहे, जो वेगळा दिसत आहे. दरम्यान या बातमीची पुष्टी झी २४ तास करत नाही.