Gold City : नेहमीच संशोधक वेगवेगळ्या गोष्टींचं संशोधन करताना दिसतात. कधी काही तर कधी काही. त्यात पुरातत्वशास्त्रज्ञांचे शोध तर आपल्याला आपल्या इतिहासत घेऊन जातात. जणू काही तो संपूर्ण इतिहास हा आपल्या नजरेसमोरून जात असतो. आता इजिप्तमध्ये असलेल्या अशाच एका ठिकाणाचा शोध लागला आहे. प्राचीन काळात सोन्याच्या व्यापारात या जागेचं खूप महत्त्व होतं. तर ही कोणती जागा आहे आणि या जागेचं नेमकं काय महत्त्व आहे त्याविषयी जाणून घेऊया...
पुरातत्वशास्त्रज्ञ जगभरात हजारो वर्षे जुन्या गोष्टी शोधताना दिसतात. यावेळी त्यांनी इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकानं असा शोध लावला आहे ज्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्यांनी इजिप्तमध्ये 3000 वर्ष जुन्या सोन्याचे शहर शोधून काढलं आहे. त्या ठिकाणी सोन्याचे खाणकाम व्हायचे. खरंतर, इजिप्तमध्ये असलेल्या या शहराला शोधण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून खोदकाम हे सुरु होतं आणि 2021 मध्ये हे शहर सापडलं. या शहराला हरवलेल्या सोन्याचं शहर म्हटलं जातं. हे शहर लाल सागरमध्ये मार्सा आलमच्या दक्षिण पश्चिममध्ये असलेल्या जबल सुक्री हे ठिकाण इ.स.पू. 1000 पर्यंत एक औद्योगिक शक्तीस्थान होते.
पुरातत्वशास्त्रज्ञांच्या या नवीन रिसर्चमध्ये हे स्पष्ट झालं आहे की या ठिकाणी सोन्याच्या खाणकामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्वार्ट्ज शिरामधून सोने काढण्यासाठी डिझाइन केलेले स्ट्रक्चर इथे सापडले आहेत. इजिप्तच्या सुप्रीम काउन्सलिंग ऑफ एंटीक्विटीजच्या जनरल सेक्रेटरी डॉक्टर इस्माइल खालेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शोध आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या पुरातत्व शोधांपैकी एक आहे. या उत्खननानंतर असं दिसून आलं आहे की हे ठिकाण सोनं तयार होण्यासाठी बनवण्यात आलेलं ठिकाण होतं. इथेच सोन्याचे तुकडे व्हायचे, त्याचं फिलट्रेशन व्हायचं आणि सोनं वितळवलं जायचं. इथे मातीच्या भट्टी देखील सापडल्या.
इजिप्तच्या या ठिकाणाचा शोध घेतल्यानंतर हे समोर आलं आहे की ही साइट प्राचीन काळात सोन्याचा व्यापार करण्याचा महत्त्वपूर्ण ठिकाण होतं. इजिप्तच्या या साइटवर टॉलमी कलचे नाणी देखील मिळाले आहे. ही नाणी मिळाल्यानंतर असा अंदाज बांधण्यात आला की ही भट्टी खूप काळ सुरु होती. या शोधानंतर इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री शेरीफ फाथी म्हणाले की, हा शोध इजिप्तमधील प्राचीन खनिजांचे इंजिनियरिंग दाखवतं. वाळवंटात सोनं काढण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे इतकी भली-मोठी भट्टी बांधली.
हेही वाचा : प्रीति झिंटा राहुल गांधींवर दाखल करणार मानहानीचा खटला? अभिनेत्रीनं कॉंग्रेसला दिलं सडेतोड उत्तर
डॉ मोहम्मद खालिद यांनी सांगितलं की साइटवर मिळालेलं सोन वितळण्यासाठी वापरण्यात आलेलं टेकनिक हे दाखवते की इजिप्तच्या लोकांकडे त्यावेळी देखील क्वार्ट्सनं सोन्याला वेगळं करण्याची पद्धत होती. सोन्याला वितळवण्यासाठी वापरण्यात आलेली भट्टी हे दाखवते की ही जागा फक्त सोनं खोदण्यासाठी नाही तर पूर्ण अॅक्टिव्ह प्रोसेसिंग साइट देखील होती.