Marathi News> विश्व
Advertisement

Google ची सर्वात गंभीर चूक, भूकंपाआधी 1 कोटींहून अधिक लोकांना नाही मिळाली वॉर्निंग, काय झाला परिणाम?

Google Earthquake Alert:  गुगलची भूकंप इशारा प्रणाली कशी कार्य करते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Google ची सर्वात गंभीर चूक, भूकंपाआधी 1 कोटींहून अधिक लोकांना नाही मिळाली वॉर्निंग, काय झाला परिणाम?

Google Earthquake Alert: 6 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी तुर्कस्तानात 7.8 रिश्टर तीव्रतेचा भयंकर भूकंप झाला. गुगलची अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट (AEA) प्रणाली कार्यरत असतानाही, सुमारे 1 कोटी लोकांना वेळेवर इशारा मिळाला नाही. केवळ 469 लोकांना "अॅक्शन घ्या" हा हाय अलर्ट मिळाला. तर 5 लाख लोकांना "सावध रहा" हा सौम्य इशारा पाठवला गेला. या इशाऱ्यामुळे फोनचा 'डू नॉट डिस्टर्ब' मोड देखील सक्रिय झाला नाही. ही तीच प्रणाली आहे, जी गुगलने 100 हून अधिक देशांमध्ये "जागतिक सुरक्षा जाळे" म्हणून कार्यान्वित केलीय. इथे राष्ट्रीय इशारा यंत्रणा कार्यान्वित नाही. गुगलची भूकंप इशारा प्रणाली कशी कार्य करते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

गुगलची AEA प्रणाली अँड्रॉइड फोनमधील सेन्सर्सद्वारे भूकंपाच्या लाटांचा शोध घेते. भूकंपाच्या लाटा हळूहळू पसरत असल्याने, काही सेकंद आधीच इशारा देणे शक्य होते. "अॅक्शन घ्या" हा गंभीर अलर्ट येतो आणि फोनवर मोठा अलार्म वाजवतो. यानंतर स्क्रीन लॉक होते आणि 'डू नॉट डिस्टर्ब' मोडही निष्क्रिय होतो. दुसरा "सावध रहा" अलर्ट सौम्य धक्क्यांबाबत माहिती देतो. पण फोन सुरु राहत नाही. तुर्कीमध्ये प्रणालीने भूकंपाची तीव्रता 4.5 ते 4.9 एमएमएस असल्याचा चुकीचा अंदाज लावला. ज्यामुळे 'अॅक्शन घ्या' हा महत्त्वाचा इशारा बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचलाच नाही.

गुगलने काय दिले स्पष्टीकरण?

त्याच दिवशी दुसऱ्या मोठ्या भूकंपातही प्रणालीने तीव्रता कमी लेखली. फक्त 8 हजार 158 लोकांना "अॅक्शन घ्या" आणि 40 लाख लोकांना "सावध रहा" असा अलर्ट मिळाला. यानंतर गुगलची यंत्रणा कामाला लागली आणि त्यावर संशोधन करण्यात आले. यानंतर गुगलने यावर खुलासा केला. 
जर अल्गोरिदम सुधारला असता, तर 1 कोटी लोकांना "कृती करा" आणि 6.7 कोटी लोकांना "सावध रहा" अलर्ट मिळू शकले असते, असा खुलासा गुगलने केला. "प्रत्येक मोठा भूकंप आमच्या प्रणालीच्या मर्यादा दाखवतो, आणि आम्ही त्यातून शिकून सुधारणा करत आहोत, असे गुगलने बीबीसीला सांगितले. 

शास्त्रज्ञांनी काय उपस्थित केले प्रश्न? 

या अपयशाची माहिती उघड करण्यासाठी गुगलला दोन वर्षे लागली, ही बाब चिंताजनक आहे. "एवढ्या मोठ्या आपत्तीत जिथे हजारो लोकांचा मृत्यू झाला, तिथे यंत्रणेच्या अपयशाची माहिती इतक्या उशिरा समजली हे अत्यंत निराशाजनक असल्याचे  कोलोरॅडो स्कूल ऑफ माइन्सच्या प्राध्यापक एलिझाबेथ रेड्डी म्हणाल्या.

गुगलवर पूर्ण अवलंबून राहणे योग्य आहे का?

आमची प्रणाली राष्ट्रीय इशारा यंत्रणेची जागा घेणारी नसून पूरक आहे, असे गुगलने म्हटलंय. असे असताना काही देश यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकतात. सध्या 98 देशांमध्ये AEA प्रणाली कार्यरत असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.

Read More