Marathi News> विश्व
Advertisement

27 तास प्रसुती वेदना आणि 21 पिल्लांना जन्म... शेवटी आईलाच हे सगळं सहन करावं लागत, मालकिणीच्या डोळ्यांतही पाणी!

Great Dane Dog :एका जीवातून नवीन जीवाची निर्मीती करणे म्हणजे नवा जन्म घेण्यासारखेच आहे. यामुळे प्रत्येक मादीला प्रसुती वेदना सहन कराव्याच लागतात. अशाच एका श्वानाने तब्बल 21 पिल्लांना जन्म दिला आहे. 

27 तास प्रसुती वेदना आणि 21 पिल्लांना जन्म... शेवटी आईलाच हे सगळं सहन करावं लागत, मालकिणीच्या डोळ्यांतही पाणी!

Great Dane Dog Give Birth To 21 Puppies: पृथ्वीवर जीवसृष्टीचा सोमतोल राखण्यासाठी प्रजनन अत्यंत महत्वाची बाब आहे. सर्व सजीवांमध्ये मादीच प्रजनन करतात. या सर्व मादी प्रकारांमध्ये मातृत्व हा समान मुद्दा पहायला मिळतो. यामुळे प्रसुती वेदना या सहन कराव्याच लागतात. अशाच एका श्वानाला  27 तास प्रसुती वेदना सहन कराव्या लागल्या. या श्वानाने तब्बल  21 पिल्लांना जन्म दिला (Great Dane Dog ). या श्वानाच्या वेदना पाहून मालकिणीच्या डोळ्यांतही पाणी आले.

सर्वसाधारणपणे श्वान 10 ते 12 पिलांना जन्म देतात. मात्र, अमेरिकेतील एका श्वानाने तब्बल 21 पिलांना  जन्म दिला आहे. या श्वानाने जवळपास 27 तास प्रसुती वेदना सहन केल्या. पिलांना जन्म देताना या श्वानाना झालेल्या त्रास आणि होत असलेल्या वेदना पाहून मालकिनीचा उरही भरुन आला. 

अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये हा प्रकार घडला आहे. ग्रेटडेन जातीच्या या  श्वानाचे नाव  नामीन असे आहे.  व्हर्जिनियाच्या पोकाहॉन्टस या छोट्या गावात  नामीन श्वान त्याची मालकिन  तान्या डब्ससोबत राहतो. 
एकाच वेळी 16 पिलांना जन्म

नामीन ही गरोदर होती. डब्स तिची काळजी घेत होती. तिच्यावर लक्ष ठेवून होती. प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर ग्रेटडेनने सुरुवातील नामीनने एकाचवेळी  16 पिलांना जन्म दिला. ऐवढी पिल्ले पाहून मी गोंधळे. कारण, सर्वसामान्यपणे कोणताही श्वान साधारण 10 ते 12 पिलांना जन्म देतो. यानंतर देखील नामीनच्या वेदना संपल्या नव्हत्या. यानंतर तिने आणखी पिलांना जन्म दिला. एकूण तब्बल 21 पिलांना नामीनने जन्म दिल्याचे तिच्या मालकीनेने सांगितले. त्यापैकी 9 नर आणि 12 मादी पिल्ले आहेत.  तब्बल 27 तास नामीन या प्रसुती वेदना सहन करत होती. असे देखील तान्या यांनी सांगितले. 

ग्रेटडेन हा श्वानप्रेमींचा सर्वात आवडता आणि लोकप्रिय प्रकार

ग्रेटडेन हा पाळीव श्वान प्रकारातील सर्वात लोकप्रिय ब्रिड आहे. मुळचं जर्मनीचं ब्रिड आहे. शिकारी प्रकारात मोडणारा हा श्वान अनेकजण घराच्या सुरक्षेसाठी पाळतात.  ग्रेटडेन अडीच फूट उंच आणि 45 किलो वजनाचा असू शकतो.  ग्रेटडेन हा सर्वात महागडे श्वान आहे. याच्या एका पिल्लाची विक्री 12 हजार रुपयांपर्यंत होते. 

Read More