Marathi News> विश्व
Advertisement

उद्घाटनानंतर काही क्षणातच पूल कोसळला, महापौरांसह अनेक अधिकारी पडले नाल्यात, पाहा VIDEO

कमकुवत बांधकामाचा फटका महापौर आणि अधिकाऱ्यांनाच बसला  

उद्घाटनानंतर काही क्षणातच पूल कोसळला, महापौरांसह अनेक अधिकारी पडले नाल्यात, पाहा VIDEO

Viral Video : विविध क्षेत्रात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आपण ऐकत असतो. मग ते रस्ते बांधणी असो, फूट ओव्हर ब्रिज असो किंवा सरकारी विभागाकडून कोणत्याही भागातलं बांधकाम असो. भ्रष्टाचाराची अशी अनेक प्रकरणं आपल्या देशात अनेकदा पाहायला मिळतात. पण इतर देशातील लोकांनाही अशी प्रकरणं नविन नाहीत. 

याचं जिवंत उदाहरण मेक्सिकोमध्ये समोर आलं आहे. एका पूलाचं उद्घाटन झाल्यानंतर काही क्षणातच तो पूल कोसळल्याची घटना मेक्सिकोत घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशय मीडियावर तो चांगलाच व्हायरल झाला आहे. 

नेमकी घटना काय?
मेक्सिकोच्या क्वेर्नावाका शहरात एका झुलत्या पुलाचं उद्घाटन होणार होते. उद्घाटनासाठी महापौरांसह शहरातील अनेक अधिकारी आणि नागरिक पोहोचले होते. महापौरांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं. यानंतर महापौरांसह अनेक अधिकारी या पूलावर आले. पण काही क्षणातच हा पूल कोसळला. आणि पुलावर असलेले सर्वजण नाल्यात पडले. 

संपूर्ण झुलता पूल खालून वाहणाऱ्या नाल्यात पडला. या अपघातावेळी महापौरांसह इतर अनेकजण उपस्थित होते. लाकडी फलकांनी बनवलेला हा झुलता पूल इतका कमकुवत होता की तो 20 जणांचे वजनही पेलू शकत नाही.

महापौरांसह अधिकारी जखमी
महापौरांसह अनेक अधिकारी जववळपास दहा फूटावरुन खाली पडले. या नाल्यात खडक आणि मोठे दगडही होते. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. पण महापौरांसह अनेकजण जखमी झाले. 

महापौरांची पत्नीही जखमी
मोरेलोसचे गव्हर्नर कुओटेमोक ब्लँको म्हणाले की, पुल कोसळल्यानंतर पडलेल्यांमध्ये महापौर जोस लुईस उरियोस्टेगुई यांच्या पत्नी आणि पत्रकारांचा समावेश आहे. कुरनावाका हे मेक्सिकोमधल्या मोरेलोस राज्यात आहे.

या दुर्घटनेत नगर परिषदेचे चार सदस्य, दोन शहर अधिकारी आणि एक स्थानिक पत्रकार जखमी झाल्याचे क्वेर्नावाका शहराच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. त्यांना स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आलं आणि स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. महापौर जोस लुईस उरियोस्टेगुई यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींना किरकोळ दुखापत झाली असून ते धोक्याबाहेर असल्याचे निवेदनात म्हटलं आहे.

Read More