Marathi News> विश्व
Advertisement

धक्कादायक! सिंहाच्या हल्ल्यात एकजण ठार

सिंहाचा अंदाज आल्यावर होग यांनी धावत दरवाजा गाठायचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता.

धक्कादायक! सिंहाच्या हल्ल्यात एकजण ठार

लिंपोपो: जंगली प्राण्यांवर विश्वास ठेवणे कसे जीवावर बेतू शकतं याचं हे धक्कादायक उदारहण. खरे तर हा व्हिडिओ तुम्हाला विचलीत करू शकतो. म्हणूनच व्हिडिओ पाहताना काळजी घ्या. ही घटना आहे दक्षिण अफ्रीकेतील. येथे एका सिंहाने काहीच सेंकदात एका व्यक्तिवर हल्ला केला आणि काही क्षणांतच त्याचा जीवही घेतला.

हा प्रकार एका प्रायव्हेट वाईल्ड लाईफ सेंक्चुरीमध्ये घडला. दरम्या,न सेंक्चुरीचे मालक माईक होग हे दक्षिण अफ्रीकेच्या लिंपोपोमध्ये आपल्या वाईल्ड लाईफ सेंक्चुरीची पाहणी करत होते. तेथे येणाऱ्या काहीशा दुर्गंधीमुळे ते हैराण झाले होते. नेमका ही दुर्गंधी कसली आहे हे पाहण्यासाठी माईक होग तेथे गेले होते. दरम्यान, कोणतहीही सुरक्षा न घेता होग या परिसरात गेले होते. त्यांना आपल्या आसपास सिंह असल्याची अजीबात कल्पना नव्हती. 

दरम्यान, एका सिंहाची नजर माईक होग यांच्यावर पडली आणि तो धावतच तेथे आला. सिंहाचा अंदाज आल्यावर होग यांनी धावत दरवाजा गाठायचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. सांबा (१०) नावाचा या सिंहाने ७२ वर्षांच्या होग यांच्यावर झडप मारली. क्षणात सारे संपून गेले. पहा व्हिडिओ...

 

Read More