Marathi News> विश्व
Advertisement

अरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video

Stunning Performance: सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शक्यतो स्थूल व्यक्तींना सूस्त मानलं जातं. शारीरिक हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागतो. वजनदार व्यक्तीला नाचणे किंवा स्टंट करणे शक्य नाही असे अनेकांचे मत आहे. 

अरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video

Stunning Performance: सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शक्यतो स्थूल व्यक्तींना सूस्त मानलं जातं. शारीरिक हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागतो. वजनदार व्यक्तीला नाचणे किंवा स्टंट करणे शक्य नाही असे अनेकांचे मत आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. कारण व्हिडीओतील व्यक्ती इतकी स्थूल असूनही बिनधास्त स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडीओतील व्यक्ती पाहून तुम्हीही तसाच म्हणाल. दीपांशु काब्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी लिहिलं आहे की, "कव्हरवरून पुस्तक काय आहे, हे ठरवू नका." 

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने एकदा नव्हे तर तर तीनदा उडी मारली. यूजर्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. अनेकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 8 सेकंदाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही तसंच म्हणाल. 

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइकही केले आहे. व्हिडीओखाली कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'हे पुस्तक नाही अख्खी लायब्ररी आहे.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'मी बारीक असूनही असा स्टंट करू शकत नाही, शाब्बास मित्रा.'

Read More