Marathi News> विश्व
Advertisement

बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची हत्या; हत्येनंतर हल्लेखोरांनी मृतदेहावर उभं राहून केला डान्स; संतापजनक VIDEO

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये व्यावसायिक भांडणातून मिटफोर्ड हॉस्पिटलजवळील रोजोनी घोष लेन येथे भंगार विक्रेत्याला काँक्रीटच्या स्लॅबच्या तुकड्यांनी मारहाण करून ठार मारण्यात आल्याचं दिसत आहे.   

बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची हत्या; हत्येनंतर हल्लेखोरांनी मृतदेहावर उभं राहून केला डान्स; संतापजनक VIDEO

बांगलादेशात एका हिंदू व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, संपूर्ण देशभरात कॉम्बिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. गृह विभागाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांनी भंगार व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी रविवारी देशभरात शोधमोहीम सुरू असल्याचं सांगितलं आहे. 9 जुलैला मिटफोर्ड रुग्णालयाजवळ लाल चंद उर्फ सोहाग यांच्या निर्घृण हत्येनंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच निवडणूकपूर्व स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आल्याचं चौधरी यांनी सांगितल्याचं वृत्त असे Prothom Alo ने दिलं आहे. 

"राजधानी मिटफोर्डमध्ये घडलेली हत्या अत्यंत दुःखद आणि क्रूर आहे. अशा घटनांना सुसंस्कृत समाजात स्थान नाही," असं ते म्हणाले आहेत. पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने (डीबी) शनिवारी रात्री या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक केली. गुप्तचर यंत्रणा इतर आरोपींनाही अटक करण्यासाठी अथक प्रयत्न करत असून, कोणालाही सोडलं जाणार नाही. कारवाई करताना त्यांची राजकीय ओळख पाहिली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

"गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो अशी सरकारची भूमिका आहे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही, मग त्याची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असो. एकाही गुन्हेगाराला आश्रय दिला जाणार नाही," असं ते म्हणाले आहेत.

चौधरी म्हणाले की, मिटफोर्ड खून खटला जलदगती न्यायाधिकरणाकडे हलविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. गुरुवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये व्यावसायिक भांडणातून मिटफोर्ड रुग्णालयाजवळील रोजोनी घोष लेन येथे भंगार विक्रेत्याला काँक्रीटच्या स्लॅबच्या तुकड्यांनी मारहाण करून ठार मारण्यात आले.

मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर हल्लेखोर मृतदेहावर नाचले. पोलिसांनी झुंडबळीत सहभागी पाच जणांना आधी ठ्क केली. या हत्येत थेट सहभाग असणाऱ्या गाझी याला पाच दिवसांची पोलीस रिमांड सुनावण्यात आली आहे. 

या झुंडबळीनंतर संपूर्ण बांगलादेशात संतापाची लाट उसळली आहे. शनिवारी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि अंतरिम सरकारवर जमावाकडून होणारा हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप केला.

ऑगस्ट 2024 मध्ये स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन (एसएडी) च्या नेतृत्वाखालील हिंसक चळवळीत तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या 16 वर्षांच्या अवामी लीग राजवटीला उलथवून टाकण्यात आल्यापासून बांगलादेशात जमावाकडून होणाऱ्या हत्यांमध्ये वाढ झाली आहे.

Read More