मुंबई : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सर्वांच्याच अंगावर काटा आणणारा आहे. येथे एक महिले रेल्वे स्टेशनवर उभी होती. परंतु तिच्यासोबत असं काही घडलं, त्याचा तिने विचार देखील केला नसावा. खरंतर ट्रेनपासून खूप लांब उभ्या असलेल्या या महिलेला चक्कर आली, आणि ती ट्रेनच्या जवळ जाऊन ट्रेनखाली आली. या महिलेचं नशिब इतकं चांगलं आहे की, ती ट्रेन खाली जाऊन देखील सुखरुप आहे. तिचे प्राण वाचले आहेत.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, ब्युनोस आयर्समधील इंडिपेंडन्स स्टेशनवर उभ्या असलेल्या इतर प्रवाशांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढले. स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली. ज्यानंतर ही व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक लोक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येण्याची वाट पाहत आहेत. या गर्दीत कँडेला नावाची एक महिला देखील असते, जी काही क्षणातच एका भीषण अपघाताची शिकार बनते.
जेव्हा प्लॅटफॉरर्मवरती ट्रेन येते, तेव्हाच या महिलेला चक्कर येते आणि ती त्याच अवस्थेत पुढे-पुढे चालत जाऊन ट्रेनवर आदळते आणि त्यानंतर ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या भागात पडते.
So this happened recently in #BuenosAires #Argentina
— Diamond Lou(@DiamondLouX) April 19, 2022
This woman apparently fainted and she fell under on an oncoming train, BUT SHE SURVIVED! She's now out of the hospital pic.twitter.com/EQA2V4foh9
ही महिला ज्या प्रकारे खाली पडते, ते पाहून तर असंच वाटतं की, ही महिला या भिषण अपघातातून वाचणं कठीण आहे. मात्र तिचे प्राण वाचले आहेत.
चालत्या ट्रेनखाली येऊनही कँडेलाला काहीच झालं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅंडेलाला प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांनी सुखरूप बाहेर काढले. ज्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे.