Marathi News> विश्व
Advertisement

कंडोममुळे सुटला बलात्कार प्रकरणातील गुंता; पीडितेला ३० वर्षानंतर न्याय, आरोपीला शिक्षा

घटना घडली तेव्हा, पीडिता ८ वर्षांची होती. केवळ कंडोमच्या आधारावर कसून तपास करत, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता सोडवणे ही, कौतुकास्पद बाब मानली  जात आहे. 

कंडोममुळे सुटला बलात्कार प्रकरणातील गुंता; पीडितेला ३० वर्षानंतर  न्याय, आरोपीला शिक्षा

लॉस एंजेलिस: अमेरिकेत घडलेल्या एका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता पोलिसांनी धक्कादायकरित्या सोडवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचायला पोलिसांना तब्बल ३० वर्षे लागली. विशेष म्हणजे वापरलेल्या कंडोममुळे पोलिसांना आरोपीबद्धल महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच माहितीच्या आधारे आरोपी जॉन मिलर (वय ५९ वर्षे) याला अटक केली. ही घटना घडली तेव्हा, पीडिता ८ वर्षांची होती. केवळ कंडोमच्या आधारावर कसून तपास करत, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुंता सोडवणे ही, कौतुकास्पद बाब मानली  जात आहे. 

वापरून फेकलेले कंडोम आरोपीच्या घरापासून  ताब्यात  

पोलिसांनी घटनास्थळांवरून पीडितेचा मृतदेह फोर्ट वायने येथून ताब्यात घेतला होता. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, वापरून फेकलेले कंडोम आरोपीच्या घरापासून २००४ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या या कंडोमची पोलिसांनी डीएनए चाचणी केली. या चाचणीचा अहवाल आला तेव्हा, पोलीस थक्क झाले. या अहवालानुसार कंडोममध्ये मिळालेले डीएनएचे नमुने आणि पीडितेच्या कपड्यांवर मिळालेल्या डीएनएच्या नमुन्यांशी मिळतेजुळते होते. कंडोमवरील मिळालेल्या डीएनएच्या आधारावरून संशोधक जॉन मिलर आणि त्याच्या भावावर बलात्कार आणि हत्येत सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

 

 

आरोपीने आरोपांचा स्वीकार केला

प्राप्त अहवालानुसार, जॉन मिलरने वापरलेलेल तीन कंडोम पीडितेच्या जेनेटिक प्रोफाइलसोबत जुळले. न्यायालयात सुनावनीवेळी आरोपीने त्याच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचा स्वीकार केला. सुनावनीवेळी पीडितेचे कुटुंबिय भाऊक झाले होते. दरम्यान, पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिची अंतरवस्त्रेही ताब्यात घेतली होती. त्या वस्त्रांवरील डीएनएवरून पोलीस तपास करत होते.

Read More