Marathi News> विश्व
Advertisement

Trending News : मृत्यू झुंज देणाऱ्या पत्नीला पतीने विचारली शेवटची इच्छा, 'Ex सोबत शारीरिक संबंध...'

Trending News : गंभीर आजाराशी तिची झुंज सुरु होती, शेवटच्या घटका ती माजते होती, अशात नवऱ्याने तिची इच्छा विचारली. त्यावेळी तिने जी इच्छा बोलून दाखवली ज्यामुळे पतीला काय करावे कळलं नव्हतं.       

Trending News : मृत्यू झुंज देणाऱ्या पत्नीला पतीने विचारली शेवटची इच्छा, 'Ex सोबत शारीरिक संबंध...'

Trending News : आयुष्यात कधी काय घडले याचा काही नेम नसतो. आपण आपल्या आयुष्यासाठी खूप काही ठरवतो, पण एक क्षण असा येतो ज्याच्यावर आपल्या कोणाचही नियंत्रण राहत नाही. असं म्हणतात काही गोष्टी या देवाने ठरवलेल्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात दोन गोष्टी कोणीच बदलू शकत नाही, ती म्हणजे एक त्याचा जन्म आणि दुसरा त्याचा मृत्यू...सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याची कहाणी व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये कमी वयात पत्नी एका गंभीर आजाराशी सामना करत असून तिच्याकडे आयुष्याचे शेवटच्या काही घटका राहिला आहेत. अशात आपण जाणाऱ्या व्यक्तीला कमी वेळात जास्त जास्त आनंद आणि त्याचा इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अशात पत्नी आपल्याला सोडून जाणार या दु:खात असून त्याने पत्नीची शेवटची इच्छा विचारली. त्यावेळी तिने जे काही  इच्छा सांगितली ते ऐकून पतीच्या पायाखालची जमीन सरकली.

Reddit वर एक पोस्ट लिहिताना पतीने त्याची दुःखद कहाणी जगासमोर मांडली आहे. तो म्हणाला की, 'माझ्या पत्नीला असाध्य आजार आहे. तिच्याकडे जगण्यासाठी जास्तीत जास्त 9 महिने आहेत. हे ऐकून मी तिथेच संपलो. आम्ही गेली अनेक वर्षे एकत्र सुखी संसार करतोय. मी तिच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करु शकतं नाही. ती गेल्यावर मी काय करेल मला माहिती नाही. तिच्या आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावे म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.'

पत्नीची शेवटची इच्छा ऐकून बसला धक्का!

पती पुढे म्हणाला की, डॉक्टरांनी सांगितलं की, त्याची पत्नी 4-5 महिन्यांत व्हीलचेअरवर येईल आणि त्यानंतर 8 महिन्यात ती बेडरिटन होईल. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने पत्नीला शेवटची इच्छा विचारचं ठरवलं. त्याने मोठ्या हिम्मतीने त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यानंतर तिची इच्छा ऐकून मला धक्काच बसला. तिने त्याला सांगितलं की, माझ्या Ex सोबत मला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. 

हेसुद्धा वाचा - Viral News : ‘मी माझ्या मुलीला कसं सांगू की तिचा भाऊ हा तिचा बाबा आहे’; महिलेने उघड केलं कुटुंबाचं ते गुपित

या धक्कातून कसाबसा सावरत त्याने तिला विचारलं की, तुझी ही इच्छा का आहे? त्यावर पत्नीने जे उत्तर दिलं त्यानंतर तो पूर्णपणे हलून गेला. ती म्हणाली की, माझा Ex प्रियकर खूप जास्त फिजिकल कंपॅटिबल आहे. तिने एक भलंमोठं भाषण देत मला म्हणाली की, माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवणे खूप सुखद अनुभव आहे. एवढंच नाही तर ती पुढे म्हणाली की, तिच्यासाठी शारीरिक संबंध ठेवणे ही इमोशनली खूप चांगल होतं. पण तिची ही इच्छा ऐकल्यानंतर या सगळ्या गोष्टी मुर्खपणाच्या वाटत आहे. 

'तुम्ही सांगा मी काय करु?'

बायकोची शेवटची इच्छा कळल्यावर पती खूप जास्त विचार पडला आहे. त्याचं मन एक गोष्ट सांगत होतं आणि डोकं एक सांगत होतं. त्यामुळे त्याने Reddit वर आपली कहाणी आणि द्वैधामनस्तीत त्याने यूजर्सला विचारलं आहे की, त्याने आता काय कराला हवं. माझ्या पुरुषी अहंकारामुळे मी तिला नकार द्यावा की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करावी कारण ती मरणार आहे. 

पण तो हेही म्हणला की, तिच्या या मागणीमुळे मी खूप दुखावलो गेलो आहे आणि माझी फसवणूक झाली आहे. शेवटी तो म्हणाला की, त्याच्या पत्नीने त्याला अशा स्थितीत अडकवलं आहे की, जिथे त्याला हो म्हणण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. कारण ती काही दिवसात हे जग सोडून जाणार आहे. 

Read More