Marathi News> विश्व
Advertisement

तिनं बॉयफ्रेंडच्या बायकोला संपवायचा परफेक्ट प्लॅन आखला, पण तो असा फसला

काही बायका आपलं नातं टिकवण्यासाठी नवऱ्याला संधी देतात, तर बऱ्याचदा काही नाती संपतात. 

तिनं बॉयफ्रेंडच्या बायकोला संपवायचा परफेक्ट प्लॅन आखला, पण तो असा फसला

मुंबई : आपण हे बऱ्याचदा ऐकले किंवा पाहिले देखील आहे की, लग्नानंतर अनेक लोकांचे बाहेर दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध असतात. काही लोकांच्या घरी म्हणजे बायकोपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. तर ज्या लोकांच्या घरी ही गोष्ट पोहोचते, त्या घरात मात्र मोठ-मोठी भांडणं सुरू होताता. यात काही बायका आपलं नातं टिकवण्यासाठी नवऱ्याला संधी देतात, तर बऱ्याचदा काही नाती संपतात. सध्या असंच एक नात्यासंदर्भात एक बातमी समोर आली आहे जी आश्चर्यकारक आहे.

ज्यामध्ये एका पुरुषाचे बाहेर प्रेमसंबंध होते, परंतु जेव्हा त्याने जेव्हा आपल्या बायकोकडे घटस्फोट मागितला तेव्हा तिने यासाठी नकार दिला.त्याच्या बायकोच्या अशा वागण्याने त्या व्यक्तीची गर्लफ्रेंड तिच्यावरी चिढते आणि रागाच्या भरात मोठं पाऊल उचलते. 

मीडिया रीपोर्टनुसार, इंग्लंडमधील नॉर्थ शील्डमध्ये एका महिलेने आपल्या ब्रॉयफ्रेंडच्या घराला आग लावली. ब्रॉयफ्रेंडची बायको घटस्फोटास नकार देत होती, त्यामुळे तिने हे पाऊल उचललं. बातमीनुसार, 23 वर्षीय क्लो शोटनचे (गर्लफ्रेंड) हे कृत्य तेव्हा पोलिसांना कळले जेव्हा त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिला.

खरेतर ही घटना 31 जुलैची आहे. क्लो शोटने रागाच्या भरात आपल्या ब्रॉयफ्रेंडची बायको ज्या घरात राहाते त्या घराला आग लावण्याचा परफेक्ट प्लॅन केला आणि घराला आग देखील लावली, पण ती अखेर पकडली गेलीच.

जेव्हा क्लो शोटनने आपल्या ब्रॉयफ्रेंडच्या बायकोच्या घराला आग लावली तेव्हा तिचा 17 वर्षांचा मुलगाही त्या वेळी त्या घरात होता. इतकंच नाही तर त्यादरम्यान या महिलेची मैत्रीण आणि तिचा लहान मुलगा देखील त्या घरात होता. या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

न्यूकॅसल क्राउन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली, ज्यामध्ये सरकारी वकिलांनी सांगितले की, पहाटे 5 च्या सुमारास या महिलेनं फायर अलार्मचा आवाज ऐकला. त्यानंतर तिने अग्निशमन दलाला फोन करून बोलावलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळला.

सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले असता संपूर्ण रहस्य उघड

यानंतर सीसीटीव्ही स्कॅन केले असता क्लो शोटनने रात्री येऊन लायटर आणि कागदाच्या सहाय्याने आग लावल्याचे दिसून आले. या प्रकरणी कोर्टाने क्लो शोटनला साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली.

या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, क्लो ही तिच्या नवऱ्याची गर्लफ्रेंड आहे. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास वेळ लागत असल्याने क्लोनने असे कृत्य केले असल्याचे या महिलेनं सांगितले.

Read More