Marathi News> विश्व
Advertisement

पाकिस्तानातील चीनी दूतावासावरील हल्ल्याची भारताकडून निंदा

पाकिस्तानातील चीनी दूतावास दाऊदच्या घराजवळ आहे

पाकिस्तानातील चीनी दूतावासावरील हल्ल्याची भारताकडून निंदा

कराची : कराची शहरात चीनी दूतावासजवळ झालेल्या स्फोटात ३ दहशतवादी आणि दोन पोलीस ठार झालेत. चीनी दूतावासावर हल्ला करण्यात आला. चीनी दुतावासावरील सुरक्षा रक्षकांनी प्रत्तुतर देण्याचा प्रयत्न केलाय. त्यात तीन दहशतवादी आणि दोन पोलीस ठार झालेत. कराचीतला अतिसुरक्षित परिसर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या क्लिफटन परिसरात हा हल्ला झालाय. याच परिसरात भारताला अनेक गुन्ह्यासाठी हवा असणारा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमही गेली अनेक वर्ष दडून बसल्याचा गुप्तचर संस्थांचा दावा आहे.

कोणत्याही दहशतवादी कृत्याला योग्य ठरविलं जाऊ शकत नाही, असं म्हणत या हल्ल्याची भारताकडून निंदा करण्यात आलीय. परदेश मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात, शुक्रवारी सकाळी कराचीच्या चीनी वाणिज्य दूतावासाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याची भारत निंदा करत आहे आणि या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या संवेदना व्यक्त करत आहे, असं म्हटलं गेलंय.   

Read More