Marathi News> विश्व
Advertisement

एका रात्रीत खेळ सुरु; चंद्राजवळ ट्रॅफीक वाढणार; चांद्रयान 3 की लुना 25 कुणाला पहिलं लँडिग करायला जागा मिळणार?

भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे. 

एका रात्रीत खेळ सुरु; चंद्राजवळ ट्रॅफीक वाढणार; चांद्रयान 3 की लुना 25 कुणाला पहिलं लँडिग करायला जागा मिळणार?

Chandrayaan-3 vs Luna-25:  भारताची चांद्रयान 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आली असतानाच भारताचा जवळचा मित्र असलेल्या रशियानेच खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. एका रात्रीत नवा खेळ सुरु होणार आहे. रशियाचे चंद्रयान 3 भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता अवकाशात झेपावणार आहे. एकाच वेळी दोन यान चंद्राच्या दिशेने झेपवणार आहेत.  यामुळे  आता  चांद्रयान 3 की लुना 25 कुणाचे यान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करणार याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार

14 जुलै 2023 रोजी भारताचे चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले आहे. चांद्रयान 3 आता चंद्राच्या कक्षेत आले आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. 14 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत चांद्रयान - 3 चंद्रापासून 100 मीटर अंतरावर असले.  17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. अखेरीस  40 दिवसांच्या प्रवासानंतर  23 ते 24ऑगस्ट दरम्यान  चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करेल. या प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असेल. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे.  

भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उरवण्याचा रशियाचा प्रयत्न

भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उरवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. यासाठी  47 वर्षानंतर रशिया पहिल्यांदाच चंद्रावर यान उतरवण्याची योजना आखली आहे. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos च्या मते, रशिया 1976 नंतर पहिले चंद्र लँडर Luna-25 लाँच करत आहे. रशिया सोयुझ-2 रॉकेटच्या मदतीने लुना-25 लँडर प्रक्षेपित केले जाणार आहे. रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथील अंतराळ केंद्रातून रशियाचे Luna-25 हे यान भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता अवकाशात झेपावणार आहे.  रशियात रही 7.10 pm अशी आहे. Roscosmos TV या youtube चॅनेलवरुन याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. 

Chandrayaan-3 की Luna-25 कोण पहिल चंद्रावर लँडिग करणार?

Chandrayaan-3 की Luna-25 कोण पहिल चंद्रावर लँडिग करणार याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण, भारताचे चांद्रयान 3 23 ते 24ऑगस्ट दरम्यान  चांद्रयान चंद्रावर लँडिग करणार आहे. तर, 23 ऑगस्ट याच दिवशी  म्हणजेच भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच आपले यान उतरवण्याचा रशियाचा प्लान असल्याची चर्चा आहे. भारताचे चांद्रयान 3 हे 40 दिवसानंतर पोहचणार आहे. तर रशियाचे Luna-25 हे यान चांद्रयान 3 मागून चंद्राकडे झेप घेत आठवड्या भरात चंद्रावर पोहचणार असल्याचा दावा केला जात आहे. 

Read More