Why Microsoft has spent 140000000000 billion to purchase human potty: दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने तब्बल 1.46 लाख कोटी रुपयांची (1.7 अब्ज डॉलर्स) डील केली आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवल हे तर नेहमीच अशी मोठी डील करत असतील. पण ही डील ऐकून तुम्हीही चाटच पडाल. कारण मायक्रोसॉफ्ट जे काही खरेदी करत आहे, ते म्हणजे 49 लाख मेट्रिक टन ‘माणसाची पॉटी’, म्हणजेच मानवी विष्ठा आणि इतर जैविक कचरा आहे. होय, हे खरं आहे. मायक्रोसॉफ्टने अमेरिकन स्टार्टअप Vaulted Deep सोबत हा 12 वर्षांचा करार केला आहे, ज्याची अंमलबजावणी 2026 पासून सुरू होणार आहे. आता प्रश्न असा की, टेक्नॉलॉजी क्षेत्रात अग्रेसर असणारी मायक्रोसॉफ्ट अशा विचित्र गोष्टीवर इतका पैसा का खर्च करत आहे?
Incच्या रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने हा निर्णय आपल्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मिशनसाठी घेतला आहे. सध्या कंपनीचे डेटा सेंटर्स आणि AI प्रोजेक्ट्समुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी जैविक कचरा खरेदी करून तो पृथ्वीच्या 5000 फूट खोल खड्ड्यामध्ये गाडून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक टन जैविक कचऱ्यावर त्यांना ‘कार्बन क्रेडिट्स’ मिळणार आहेत, जे त्यांच्या कार्बन फुटप्रिंटला कमी करण्यात मदत करणार आहेत. कंपनीचा दावा आहे की, या पद्धतीमुळे ते आपल्या वाढत्या कार्बन उत्सर्जनात 23 ते 30 टक्क्यांनी घट करू शकतात.
ही डील केवळ मानवी विष्ठेपुरती मर्यादित नाही. यात उपचारित सांडपाणी, शेतीतील जैविक अवशेष, खतं आणि इतर सेंद्रिय कचरा यांचाही समावेश आहे. मायक्रोसॉफ्ट हा सर्व जैविक कचरा Vaulted Deep कंपनीच्या मदतीने जमिनीत खोलवर साठवणार आहे, जेणेकरून त्यातून कोणतेही हानिकारक वायू वातावरणात सोडले जाणार नाहीत.
मायक्रोसॉफ्टचे हे पाऊल भविष्यातील पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक कंपन्या विविध मार्ग वापरत आहेत, पण मानवी विष्ठा वापरून कार्बन क्रेडिट मिळवण्याचा मायक्रोसॉफ्टचा मार्ग नक्कीच वेगळा आणि चर्चेचा विषय ठरतो आहे.