Marathi News> विश्व
Advertisement

 

इराण होर्मुझचा समुद्रमार्ग बंद; राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अंतिम मंजुरीनंतर निर्णय लागू होणार

इराण होर्मुझचा समुद्रमार्ग बंद; राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अंतिम मंजुरीनंतर निर्णय लागू होणार

 

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने तेलपुरवठा करणा-या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचे आणि दरवाढीचे संकट येऊ शकते. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच हा निर्णय लागू होईल. 96 मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी 21 मैल रुंद आहे. ही होर्मुझची सामुद्रधुनी ओमानचे आखात, अरबी समुद्र यांना जोडते. येथूनच जहाजे पुन्हा हिंदी महासागराकडे वळतात. पर्यायी मार्ग आणि तेलाचा तुटवडा यामुळे कच्च्या इंधनतेलाचे सध्या असलेले 75 डॉलर प्रति बॅरल हे दर थेट 120 ते 130 डॉलरपर्यंत जाऊ शकतात.

Read More