इराण आणि इस्रायलमध्ये आता सर्व काही शांत असलं तरी काही महिन्यांपूर्वी मात्र दोन्ही देश आमने-सामने ठाकले होते. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले होते. या हल्ल्याची तीव्रता किती होती हे दर्शवणारा एक व्हिडीओ आता इराणच्या माध्यमांनी रिलीज केला आहे. या व्हिडीओत तेहरानमध्ये इस्रायली संरक्षण दलांनी (IDF) केलेल्या हवाई हल्ल्याचं छायाचित्रण केल्याचा त्यांचा दावा आहे. हा व्हिडीओ जून महिन्यातील आहे.
या व्हिडिओमध्ये उत्तर तेहरानमधील दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात स्फोट झाल्याचं दिसत आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, स्फोटांच्या तीव्रतेमुळे प्रवाशांसह गाड्या हवेत उडतात. हा कथित हल्ला ऑपरेशन "रायझिंग लायन" दरम्यान झाल्याचं सांगितलं जात आहे.
Explosive Footage of So-called Precision Strikes by Israel on Iran During 12-Day War - Released by Iranian Media
— RT_India (@RT_India_news) July 3, 2025
The second blast sends multiple cars spinning into the air. pic.twitter.com/ql2DlHSwb1
महिन्याच्या सुरुवातीला इराणी ठिकाणांवर झालेल्या इस्रायली हल्ल्यांमुळे सुरू झालेल्या 12 दिवसांच्या हवाई युद्धानंतर हे हल्ले झाले. इराणला अण्वस्त्रं मिळविण्यापासून रोखण्याची गरज असल्याचं सांगून अमेरिकाही या युद्धात सहभागी झाली होती.
तथापि, इराणने त्यांचा अणुकार्यक्रम केवळ शांततापूर्ण हेतूंसाठी आहे असं स्पष्ट केलं. परंतु इराणने हल्ल्यांपूर्वी त्यांचे काही अत्यंत समृद्ध युरेनियम साठे हलवले असतील असे दावे आहेत. यामुळे पाश्चात्य देशांना संशय आहे.