Marathi News> विश्व
Advertisement

आनंद आणि ईशा अंबानीचा साखरपुडा, आकाशातून फुलांचा वर्षाव

साखरपुड्याला अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी

आनंद आणि ईशा अंबानीचा साखरपुडा, आकाशातून फुलांचा वर्षाव

इटली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचा साखरपुडा 21 सप्टेंबरला इटलीमधील लेक कोमो येथे झाला. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा आणि आनंद चर्चेत आहेत. दोघांच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या साखऱपुड्याचे ऑफिशियल फोटो अजून समोर आलेले नाही. पण एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ईशा आणि आनंद कोमो लेकच्या किनारी उभे आहेत आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो आहे. त्यांच्यासमोर फाउंटेन सुरु आहे ज्यामुळे वातावरण आणखी रोमँटिक बनलं आहे. या दरम्यान आनंदने हिरव्या रंगाची शेरवानी घातली आहे. तर ईशा क्रीम रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये उपस्थित पाहुणे देखील पाहू शकता. 

ईशाची आई नीता अंबानी या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक कलाकांरांनी देखील हजेरी लावली. ज्यामध्ये सोनम कपूर, अनिल कपूर, आनंद आहूजा, प्रियंका चोपडा, निक जोनस, मनीष मल्होत्रा, जाह्ववी कपूर आणि जूही चावला या सारखे कलाकार होते.

Read More