Israel Iran Attack: इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आहे. इस्त्रालयाने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्बहल्ले केले आहेत. याशिवाय इस्त्रालयाने इराणच्या लष्करी आणि अणुऊर्जा ठिकाणांवरही हल्ले केले आहेत. आपण शुक्रवारी सकाळी इराणवर हल्ला केल्याची माहिती इस्त्रायलकडून देण्यात आली आहे. इराणमधील स्थानिक माध्यमांनी तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त दिलं आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्त्रायलने इराणसाठी अणुबॉम्ब तयार करणाऱ्या वैज्ञानिकांवरही हल्ला केल्याची माहिती दिली आहे.
इस्त्रालयच्या हवाई दलाने इराणच्या लष्करी आणि अणुप्रकल्पांच्या ठिकाणांवर डझनभरापेक्षा जास्त मिसाईल्स डागले आहेत. इस्त्रायची संरक्षण यंत्रणा आयडीएफने हा संयुक्त आणि आधीपासून ठरवण्यात आलेला हल्ला असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेनेही या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली असून, आपला या हल्ल्यात काही सहभाग नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
SCENES As missiles coming from Iran have reached Israel
— The Uncivilised One (@Sea2Sea1Way) June 13, 2025
It’s now a two way war pic.twitter.com/w71j0Ekd1j
इराणी मीडिया आणि सरकारी यंत्रणांनी हल्ल्याला दुजोरा देताना म्हटलं आहे की, तेहरानमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ इमाम खोमेनी बंद करण्यात आलं आहे. इस्रायलने हल्ला केल्याचे स्वतः नेतान्याहू यांनी सांगितले. दरम्यान, इराकनेही आपली हवाई सीमा पूर्णपणे सील केली आहे आणि सर्व विमानतळांवर विमानांचं उड्डाण थांबवण्यात आलं आहे. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणच्या अनेक लष्करी तळांना आणि वैज्ञानिक केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.
आयडीएफने म्हटलं आहे की हा हल्ला गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आला होता आणि त्यात डझनभर आयएएफ इस्रायली हवाई दलाच्या विमानांचा समावेश होता. लष्कराने नागरिकांना होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
या संपूर्ण हल्ल्यापासून अमेरिकेने स्वतःला दूर ठेवले आहे. यापूर्वी, दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले होते की इस्रायलने हे हल्ले स्वतःहून केले आहेत आणि त्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. यानंतर मार्को रुबियो यांनीही याचा पुनरुच्चार केला होता. हल्ल्यानंतर, आयडीएफने म्हटले आहे की इराण इस्रायलविरुद्ध थेट आणि अप्रत्यक्षपणे दहशतवादी कारवायांना सतत प्रोत्साहन देत आहे आणि त्यांच्या प्रॉक्सी गटांद्वारे या प्रदेशात अस्थिरता पसरवत आहे. आता इस्रायलने प्रत्युत्तर दिल्याने, येणाऱ्या काळात पश्चिम आशियात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
इस्रायली हल्ल्यांनंतर तेहरानमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारी माध्यमांनुसार, राजधानीतील शाहिद महालत्ती भागात इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी आग लागली आणि वाहने ढिगाऱ्यात गाडली गेली. सकाळी लोक रस्त्यावर उतरल्यानंतर विध्वंस पाहून घाबरले होते. तेहरानच्या अनेक रस्त्यांवर मलबा, ढिगारा आणि कचरा पसरला आहे असून गोंधळाचे वातावरण आहे.