Marathi News> विश्व
Advertisement

इराण-इस्त्रायल शस्त्रसंधीवरून डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी

इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधीचा दावा फेटाळला
 

इराण-इस्त्रायल शस्त्रसंधीवरून डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू होते. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायल यांच्यात शस्त्रसंधी केल्याचा दावा केला होता. मात्र ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणने धुडकावून लावली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प तोंडघशी पडले आहेत. 

इस्त्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये मागील काही दिवसांपासून युद्धाचा भडका उडाला आहे. यात अमेरिकेनं उडी घेत इराणमधील आण्विंक तळांवर अमेरिकेनं हल्ला केला होता. मात्र आता अवघ्या दोनच दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायल यांच्यात शस्त्रसंधीवरून एकमत झाल्याचा दावा केला होता. मात्र इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला आहे. सध्या असा कोणताही करार झालेला नसल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केलं आहे.

सिझफायर ट्रम्प यांच्यावर बॅकफायर 

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 12 दिवसांनंतर इराण आणि इस्त्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा 
- दोन्ही देशांत शस्त्रसंधीवर सहमती झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
- इराणने डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधीचा दावा फेटाळला
- सध्या शस्त्रसंधीचा कोणताही करार झाला नसल्याच इराणकडून स्पष्ट
- इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघचींकडून शस्त्रसंधी झाली नसल्याचं स्पष्ट

भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत आपणच शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. तेव्हा भारतानेही ट्रम्प यांचा दावा फेटाळला होता. आता त्याची पूनरावृत्ती इराण-इस्त्रायलच्या युद्धात झाल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांनी केलेला शस्त्रसंधीचा दावा इराणने फेटाळला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली आहे.

Read More