Marathi News> विश्व
Advertisement

'त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल'; इस्त्राईलचे PM नेतेन्याहू यांचा गंभीर इशारा

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी गंभीर इशारा देत म्हटले आहे, की 'हमासच्या हल्लांविरोधात इस्राईल कोणतीही नरमाईची भूमिका घेणार नाही'. 

'त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल'; इस्त्राईलचे PM नेतेन्याहू यांचा गंभीर इशारा

येरुशलम : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी गंभीर इशारा देत म्हटले आहे, की 'हमासच्या हल्लांविरोधात इस्राईल कोणतीही नरमाईची भूमिका घेणार नाही'. 

पॅलेस्टाईन क्षेत्राला टार्गेट करण्यासाठी इस्राईलकडून बॉम्ब डागले जात आहेत. तेल अवीवमधील सैन्य मुख्यालयात झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीत नेतेन्याहू म्हटले की, 'आमच्या शहरांवर रॉकेट डागले गेले. त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल. दरम्यान, इस्त्राईलने गाजापट्टीवर सैन्याची तैनाती केली आहे'.

मुस्लिम देशांच्या संघटनेने या कारवाईबाबत इस्राईलवर टीका केली आहे. मुस्लिम संघटनेने म्हटले आहे की, 'इस्राईलचे कृत्य जगभरातील मुसलमानांच्या भावनांना ठेच पोहचवण्यासारखे आहे. तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे'. संघटनेने इस्त्राईलवर हल्ले रोखण्यासाठी दबाव आणला आहे. क्षेत्राच्या सुरक्षिततेला धोका पोहचला आहे. संघटनेने स्वतंत्र पॅलस्टाईनचा मुद्दा पुन्हा पटलावर ठेवला आहे.

Read More