Marathi News> विश्व
Advertisement

119 प्रवाशांनी भरलेले विमान 10 मिनिटांत 26000 फूट खाली कोसळले; थरकाप उडला; लोकांनी शेवटच्या मेसेजमध्ये बँक डिटेल्स, मृत्यूपत्र, आणि...

जपानमध्ये एक थरारक घटना घडली आहे. 36,000 फूट उंचीवर उड्डाण करणारे विमान 10 मिनिटांत 26000 फूट खाली कोसळले. या विमानात 119 प्रवासी होते.    

119 प्रवाशांनी भरलेले विमान 10 मिनिटांत 26000 फूट खाली कोसळले; थरकाप उडला; लोकांनी शेवटच्या मेसेजमध्ये बँक डिटेल्स, मृत्यूपत्र, आणि...

Japan Airlines Boeing plane fell 26000 feet : जपानमध्ये एक थरराक घटना घडली आहे. जपान एअरलाईन्सचे  बोईंग 737 विमान अपघातातून थोडक्यात बचावले आहे. हे बोईंग विमान चीनहून जपानची राजधानी टोकियोला जात होते. शांघायमध्ये विमानाने उड्डाण करताच त्यात समस्या निर्माण झाली आणि अचानक खाली येऊ लागले. सुमारे 26 हजार फूट उंचीवरून विमान कोसळले. यामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. मृत्यूच्या भितीने प्रवाशांनी शेवटचे मेसेज पाठवले. या विमानातून 119 प्रवासी प्रवास करत होते.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे.   बोईंग 737 विमानात 119 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 200 जण होते. बहुतेक प्रवासी चीनचे होते, जे जपानमधील टोकियोला जात होते. जपान सरकारच्या म्हणण्यानुसार, केबिनमध्ये काही तांत्रिक बिघाड होता.  जो वैमानिकांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, विमानाला 10 मिनिटांत 26000 फूट उंचीवरून खाली आणण्यात आले.

सुरुवातीच्या अहवालात असे म्हटले आहे की विमानाने केबिनमध्ये हवेचा दाब राखणाऱ्या प्रेशरायझेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्याचा इशारा दिल्यानंतर वैमानिकांनी हवाई वाहतूक नियंत्रकांशी संपर्क साधला. विमान उतरताच एअर होस्टेसने इशारा दिला. इशारा ऐकताच विमानात गोंधळ उडाला. प्रवाशी भितीने आरडा ओरडू करु लागले. 
घटनेदरम्यान विमान 36,000 फूट उंचीवर उड्डाण करत होते. मात्र, अचानक 10 मिनिटांत विमान 26,000 फूट उंचीवर आले. यानंतर जमिनीपासून 10,500 फूट उंचीवर पोहोचताच, पायलटने विमान कसेतरी नियंत्रित केले. यानंतर ताबडतोब विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. लँडिंगनंतर विमान सुमारे 1 तास तसेच ठेवण्यात आले. त्यानंतरच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, विमान 26000 फूट उंचीवरुन खाली कोसळताना पाहून प्रवासी भयभित झाले. मृत्यूच्या भितीने लोकांनी लगेच सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली. त्याच वेळी काही लोकांनी त्यांचे शेवटचे मृत्युपत्र लिहायला सुरुवात केली. अनेकांनी आपले बँक डिटेल्स शेअर केले. सर्व प्रवासी या अपघाततून सुखरुप बचावले आहेत.  मात्र, एअरलाईन्सच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप झाला.  जपान एअरलाइन्सने सर्व प्रवाशांना सुमारे 10 हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. एअरलाइन कंपनीने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Read More