Marathi News> विश्व
Advertisement

उत्तर कोरियाला प्रत्युत्तर म्हणून जपान उभी करणार क्षेपणास्त्र बचाव यंत्रणा

किम जोंगच्या उ. कोरियाने यावर्षी जपानवरून दोन क्षेपणास्त्र सोडली होती. 

उत्तर कोरियाला प्रत्युत्तर म्हणून जपान उभी करणार क्षेपणास्त्र बचाव यंत्रणा

टोक्यो : किम जोंगच्या उ. कोरियाने यावर्षी जपानवरून दोन क्षेपणास्त्र सोडली होती. 

उ. कोरियाची धमकी

अलिकडच्या काळात उ. कोरिया सातत्याने जपानविरूद्ध आक्रमक होत चाललाय आणि जपानला धमकावतोय. जपानला समुद्रात बुडूवून टाकू, अशीही धमकी उ. कोरियाने दिली आहे. या वर्षभरात उ. कोरियाने दोन क्षेपणास्त्र चाचणी घेत असताना जपानवरून पॅसिफिक महासागरात सोडली होती.  

जपानचं उत्तर

जपान सरकारने नुकतीच क्षेपणास्त्र बचाव यंत्रणेच्या योजनेला मंजूरी दिली आहे. अमेरिकी लष्कराकडून ही यंत्रणा घेण्यात येणार आहे. उ. कोरियाचा आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम दिवसेंदिवस संपूर्ण जगासाठी धोकादायक बनत चाललाय. त्यातच जपानला असलेला धोका वाढत चाललाय.   

बदलतं धोरण

नवी क्षेपणास्त्र बचाव यंत्रणा कार्यान्वीत होण्यासाठी काही वर्ष लागतील. या यंत्रणेवर एकूण १.८ अब्ज डॉलर्सचा खर्च येणार आहे. जपानच्या संरक्षणविषयक धोरणात आमुलाग्र बदल झाला असून उ. कोरिया आणि चीनच्या लष्करी धोरणाचा जपानवर मोठाच परिणाम होतोय.

Read More