Marathi News> विश्व
Advertisement

20 दिवसांनी 'या' देशात महाभयानक प्रलय येणार? जपानी बाबा वेंगाची डेंजर भविष्यवाणी चर्चेत; धडाधड विमान आणि हॉटेलचे बुकिंग कॅन्सल

 जुलै 2025 मध्ये जगात मोठी त्सुनामी येणार असल्याचा इशारा जपानी बाबा वेंगाने दिला आहे. ही त्सुनामी 2011 मध्ये जपानला आलेल्या त्सुनामीपेक्षा तिप्पट मोठी असेल. 

20 दिवसांनी 'या' देशात महाभयानक प्रलय येणार? जपानी बाबा वेंगाची डेंजर भविष्यवाणी चर्चेत; धडाधड विमान आणि हॉटेलचे बुकिंग कॅन्सल

Japanese Baba Vanga Ryo Tatsuki July 5 Prediction : 20 दिवसांनी  म्हणजेच 5 जुलै 2025 रोजी पृथ्वीवर भयानक विनाश होणार आहे. जपानी बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी चर्चेत आली आहे. फक्त तारीखच नाही तर हा विनाश कुठे होणार या ठिकाणाचे नाव देखील जपानी बाबा वेंगाने सांगितले आहे. जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून या देशात जाणास इच्छुक असलेले पर्यटक विमान आणि हॉटेलचे बुकिंग धडाधड कॅन्सल करत आहेत. 

जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. जपानी बाबा वेंगाची भविष्यवाणी ही बाबा वेंगाच्या भविष्यवाणीपेक्षा भयानक आहे. जुलै महिन्यात महाप्रलय येणार असल्याची भविष्यवाणी जापानी बाबा वेंगाने केली आहे.  भारतासाठीही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जपानी बाबा वेंगाने केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. जाणून घेऊया कोण आहे हा जपानी बाबा? जपानी बाबा वेंगाने 2025 या वर्षासाठी काय भविष्यवाणी केली आहे जाणून घेऊया. बाबा वांगा आणि नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी नेहमीच चर्चेत असते. यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. अशातच जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रियो तुतुस्की यांची भविष्यवाणी देखील चर्चेत आली आहे.  रियो तुतुस्की जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखले जातात.

5 जुलै  2025 रोजी विनाशकारी आपत्ती येणार आहे. आतापर्यंतच्या सर्वात भयानक संकटांपैकी डेंजर असेल. जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राखाली एक दरी निर्माण होईल, ज्यामुळे 2011 च्या तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट विनाशकारी लाटा उसळतील. 2011 मध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे त्सुनामीमध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले. त्या त्सुनामीमुळे फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले. 1986 मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या चेर्नोबिल अपघातानंतर हा सर्वात मोठा अणु अपघात होता. 5 जुलै  2025 रोजी यापेक्षा आणखी काही तरी भयानक घडू शकते असे भाकित जपानी बाबा वेंगाने केले आहे. फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया देशांना या  त्सुनामीचा मोठा फटका बसेल. भारतातही या  त्सुनामीमुळे मोठा महाप्रलय येईल. भारतात मोठे नुकसान होऊ शकते असे भाकित या जपानी बाबा वेंगाने वर्तवले आहे. 

 

5 जुलै रोजी होणाऱ्या भविष्यवाणीचा परिणाम जपानच्या पर्यटनावर पडला आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजेंसच्या अहवालात असे दिसून आले आहे की  जपानला जाणारी विमाने आणि हॉटेल बुकिंग, विशेषतः हाँगकाँगमधून, सुमारे 50 टक्के कमी झाले आहे.  चीन, थायलंड आणि व्हिएतनाममधील बरेच लोक आता त्या तारखेच्या आसपास जपानला जाणारे त्यांचे प्रवास टाळत आहेत किंवा पुढे ढकलत आहेत. 

रियो तुतुस्की यांचा अनेक भाकिते खरी ठरली आहेत.  1995  मध्ये रियो तुतुस्की त्यांच्या डायरीत अनेक भाकिते लिहून ठेवली आहेत. 25 वर्षांनी, म्हणजे 2020 मध्ये, एक रहस्यमयी विषाणू जगात थैमान घालू शकतो. 2020 मध्ये जगात कोरोनाचा प्रकोप पहायला मिळाला. रियो तुतुस्की याने केलेली  राजकुमारी डायनाचा मृत्यू, कोबे भूकंप आणि त्सुनामीबद्दलच्या भाकितेही खरी ठरली आहेत. 

Read More