Marathi News> विश्व
Advertisement

11 दिवसांत भूकंपाचे 880 धक्के! 5 जुलैची भविष्यवाणी खरी ठरण्याआधीच जपानमध्ये भयानक घडामोडी

5 जुलै  2025 रोजी भयानक त्सुनामी येवू शकते अशू भविष्यवाणी जापनी बाबा वेंगाने केली आहे. अशातच आता जपानमध्ये भितीदायक घडामोडी घडत आहेत. 11 दिवसांत भूकंपाचे 880 धक्के जाणवले आहेत. 

 11 दिवसांत भूकंपाचे 880 धक्के! 5 जुलैची भविष्यवाणी खरी ठरण्याआधीच जपानमध्ये भयानक घडामोडी

Tokara Islands 880 Earthquakes : 5 जुलै  2025 रोजी जपानमध्ये विनाशकारी आपत्ती येणार आहे. अशी धडकी भरवणारी भविष्यवाणी  जपानी बाबा वेंगाने केली आहे. 5 जुलैची भविष्यवाणी खरी ठरण्याआधीच जपानमध्ये भयानक घडामोडी घडत आहेत. जापनमध्ये 11 दिवसांत भूकंपाचे 880 धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे जपानमध्ये दहशत पसरली आहे. यामुळे येत्या काळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आणखी वाढली आहे. तसेच बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरते की काय अशी भिती देखील निर्माण झाली आहे. 

जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रियो तुतुस्की हे जपानी बाबा वेंगा म्हणून ओखळले जातात.  जुलै महिन्यात महाप्रलय येणार असल्याची भविष्यवाणी या जापानी बाबा वेंगाने केली आहे. 5 जुलै  2025 रोजी जपानमध्ये विनाशकारी आपत्ती येणार आहे. ही आपत्ती आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आपत्तींपेक्षा स्रवात भयानक असेल. जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राखाली एक दरी निर्माण होईल. यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतील. समुद्राता उसळणाऱ्या या लाटा 2011 च्या तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट विनाशकारी असू शकतात अशी भिती देखील व्यक्त करण्यात आली आहे. 

जपानच्या दक्षिणेकडील दुर्गम भागातील टोकारा आयलंड मालिकेतील अकुसेकिजिमा बेटावर सतत भूकंपांचे हादरे बसत आहेत. यामुळे लोकांची झोप उडाली आहे.  21 जून 2025 पासून या बेटावर भूकंपाचे धक्के जाणवायला सुरूवात झाली आहे. जपान हवामान संस्थेने 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत या प्रदेशात 736 भूकंपांची नोंद केली होती. त्यापैकी 50 पेक्षा जास्त भूकंप बहुतेक लोकांना जाणवतील इतके तीव्र होते. 

जपानच्या 7-पॉइंट मॅग्निट्यूड स्केलवर प्रत्येक भूकंपाची तीव्रता किमान 3 होती, परंतु नंतर भूकंप 5 पेक्षा कमी तीव्रतेचा होता, जो वस्तू खाली पाडण्यासाठी पुरेसा होता. अकुसेकिजिमा हे ज्वालामुखी बेट आहे ज्यामध्ये उंच कडे आहेत आणि वारंवार भूकंपाच्या हालचालींसाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात ते बांधले गेले आहे. 89 लोकसंख्येचे हे गाव समुद्रसपाटीपासून 150 मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे, ज्यामुळे त्सुनामीचा धोका कमी होतो. हे बेट प्रांतीय राजधानी कागोशिमापासून 250 किलोमीटर दक्षिणेस स्थित आहे. येथे पोहोचण्यासाठी एकमेव नियमित वाहतूक म्हणजे आठवड्यातून दोनदा येणारी फेरी आहे. येथे प्रत्येक दिशेने जाण्यासाठी 10 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. 

रियो तुतुस्की यांची 5 जुलैची भविष्यवाणी खरी ठरली तर भयानक स्थिती निर्माण होऊ शकते.  2011 मध्ये जपानमध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर जापमध्ये महाप्रलयकारी भूकंप आला होता. या त्सुनामीमध्ये हजारो लोकां मृत्यू झाला होता. या त्सुनामीमुळे फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले. 1986 मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या चेर्नोबिल अपघातानंतर हा सर्वात मोठा अणु अपघात होता. 5 जुलै  2025 रोजी यापेक्षा आणखी काही तरी भयानक आपत्ती येऊ शकते अशी भविष्यवाणी या जपानी बाबा वेंगाने केली आहे. 

 

Read More