Marathi News> विश्व
Advertisement

Video: भिंतीतून निघत होत्या रक्ताच्या धारा, प्लंबर येताच उघड झालं सत्य

एखाद्या घराच्या भिंतीतून रक्ताचे धारा निघत असतील तर ही धक्कादायक गोष्ट आहे.

Video: भिंतीतून निघत होत्या रक्ताच्या धारा, प्लंबर येताच उघड झालं सत्य

Bathroom Wall Red Oil: पावसाळ्यात घरात लीकेज होणं किंवा भिंतीना ओल पकडणं या सामान्य गोष्टी आहेत. जुन्या घरांमध्ये बहुतांश वेळा अशा समस्या जाणवत असतात. अनेकदा भिंतींना पोपडे येतात. त्यामुळे डागडुजी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. जर एखाद्या घराच्या भिंतीतून रक्ताचे धारा निघत असतील तर ही धक्कादायक गोष्ट आहे. असेच काहीसे अमेरिकेतील एका महिलेच्या घरातील बाथरूमच्या भिंतीमधून होत होतं. 

'मिरर यूके'च्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, लेक्सी असे या महिलेचे नाव असून संबंधीत घटना तिच्या घरी घडली. तिला बाथरुममध्ये रक्तासारखं काहीतरी ओघळत असल्याचं दिसलं. घाबरतच तिने आपल्या शेजाऱ्याला बोलावले, संबंधित प्रकार सांगितला.  महिलेच्या शेजाऱ्याने तिला प्लंबरला बोलवण्याचा सल्ला दिला.  त्यानंतर ते रक्त आहे की आणखी काही हे कळेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्लंबर आल्यानंतर त्याने भिंतीचा वरचा थर काढायला सुरुवात केली. भिंतीचा हलका थर काढला तरी नेमकं कारण कळत नव्हतं. बारकाईने पाहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला. वरच्या बाजूला पंख्याचा ग्रिप होता मात्र पंखा लावलेला नव्हता. त्यामुळे ग्रिपवर गंज तयार झाला होता. त्यात बाथरुममधील आर्द्रतेमुळे गंजाचे डाग भिंतीवर पडत होते. 

Read More