Marathi News> विश्व
Advertisement

रजनीकांतचा ‘काला’ फेसबूकवर लिक

सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. अनेकांनी रात्र जागून तिकीट खरेदी केले आणि फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. तर काहींनी 

रजनीकांतचा ‘काला’ फेसबूकवर लिक

सिंगापूर : सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. अनेकांनी रात्र जागून तिकीट खरेदी केले आणि फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. तर काहींनी सिनेमागृहात हा सिनेमा पाहताना मोबाईलमध्ये कैद केला. एकाने उत्साहाच्या भरात हा सिनेमा फेसबूकवर लाईव्ह केला. त्यामुळे हा 'काला'  सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी फेसबूकवर लाईव्ह करणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरु आहे.

fallbacks

 रजनीकांतचे चाहते आपल्या अभिनेत्याला 'देव' मानतात. त्यामुळे रजनीकांतचा सिनेमा पाहण्यासाठी चाहते नेहमी गर्दी करताना दिसतात. यावेळीही तशीच गर्दी झाली. ‘काला’ चित्रपटगृहात झळकताच शिट्या, आवाज, प्रार्थना सुरू झाल्या. दरम्यान, रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘काला’ चित्रपट पाहाण्यासाठी चाहते बुधवारी रात्रीपासूनच चित्रपटगृहांबाहेर गर्दी करून होते. अनेकांनी त्यांच्या सारखीच आपली वेशभूषा केली होती. फटाके, ढोल, मिठाई वाटप करत ‘काला’ चित्रपटाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.  

fallbacks

सिंगापूरमधील एका चाहत्याने हद्दच केली. त्याने सिनेमा फेसबूक लाईव्ह केला. अनेकांना चित्रपट फेसबूकवर लाईव्ह पाहायला मिळाला. पण दुसरीकडे चित्रपट वितरक आणि पोलिसांची पळापळ सुरू झाली. अखेर लाईव्ह करणाऱ्या त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दक्षिणेतील अभिनेता विशाल यानं यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. तसंच हे लाईव्ह देखील फेसबूकवरून हटवण्यात आल्याचे सांगितले. तसे त्यांनी ट्विट केलेय.

Read More