अमेरिकेतील माजी खासदार केट निवेटन यांनी लग्नानंतर झालेल्या छळाबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे. 2019 ते 2024 पर्यंत खासदार म्हणून काम करणाऱ्या केट निवेटन यांनी पहिल्यांदाच माजी खासदार अँड्र्यू ग्रिफिथ्स यांच्याशी लग्नानंतर झालेल्या मानसिक छळाबद्दल उघडपणे भाष्य केलं असल्याचं वृत्त मेट्रोन दिलं आहे. ग्रिफिथ्स यांनी झोपेत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. तसंच नवजात बाळावर ओरडल्याचाही दावा केला आहे. "तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही", असं म्हणत त्याने तक्रारीच्या धमक्या फेटाळून लावल्याचं त्यांचं म्हणणं आहे. निवेटन यांनी सांगितलं आहे की, हिंसेदरम्यान त्या अनेकदा रडत असत. तसंच ग्रिफिथ अनेकदा रागाच्या भरात तिला अंथरुणावरून बाहेर काढत असल्याच्या घटनांचाही उल्लेख केला.
54 वर्षीय केट निवेटन यांनी अनेकदा हिंसक नात्यातून बाहेर पडल्यानंतरही काहींना छळाचा सामना करावा लागतो याकडे लक्ष वेधलं. तसंच कौटुंबिक न्यायालय मुलांचं रक्षण करण्यात अयशस्वी ठरत असल्याचंही म्हटलं. एकदा मूल भूक लागल्याने रडत असताना पती त्याच्यावर "shut the f*** up" असं ओरडला होत असं त्याने सांगितलं.
"लोकांना व्यावसायिक मध्यमवर्गीय लोकांसोबत हे होणार नाही असं वाटतं. पण कौटुंबिक हिंसाचाराला कोणतीही सीमा नसते. कोणालाही त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. जेव्हा मी निवडून आले, तेव्हा मी घरगुती अत्याचाराच्या पीडितांची बाजू मांडण्याची शपथ घेतली होती. मी केवळ 10 वर्षांच्या अत्याचारानेच नव्हे तर पुढील पाच वर्षांत जेव्हा त्याने माझ्यावर अत्याचार करण्यासाठी कायदेशीर व्यवस्थेचा वापर केला त्याच्याने घाबरली होती," अशा खुलासा त्यांनी केला.
अँड्र्यू ग्रिफिथ्स आणि निवेटन 203 मध्ये विवाहबद्ध झाले होते. मात्र 2018 मध्ये ते वेगळे झाले. महिला किती सहजपणे अशा घाणेरड्या नातेसंबंधात अडकू शकतात हे त्यांनी सांगितलं. "तो खूप व्यक्तिमत्त्ववान, मोहक आणि करिष्माई होता. मागे वळून पाहिल्यास, मला धोक्याची सूचना दिसत होती. परंतु मी नेहमीच असं मानत असे की तो खूप दबावाखाली होता," असं त्यांनी सांगितलं.
"बाहेरुन पाहणाऱ्या अनेक लोकांसाठी हे नातं अगदी योग्य आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा अत्याचार सुरु होता. जेव्हा कधी मी त्याला पोलिसांकडे जाईन, तुझी तक्रार करेन असं सांगायची तेव्हा तो म्हणायचा, कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, मी येथे खासदार आहे. माझे पोलिसांसोबत चांगले संबंध आहेत. त्यांना मीच पीडित आहे असं वाटेल," असंही तिने सांगितलं.
लोकांसमोर असणारी इमेजच्या अगदी उलट त्याचा स्वभाव आहे असं सांगताना तिने धक्कादायक अनुभव उघड केले. मी झोपेत असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार केला जात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तसंच दोन महिन्यांच्या मुलाला हिंसक वागणूक दिली जात असल्याचंही सांगितलं. "मला आठवतं जेव्हा मी जागी व्हायची तेव्हा तो माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असे. कधीकधी मी शांतपणे सहन करत असे, तर कधीकधी रडत असे," असं त्यांनी सांगितलं.
"मी जेव्हा झोपेत असायचे तेव्हा त्याची सुरुवात व्हायची. मी जागी झाली की तो सेक्स करण्यास सुरुवात करत असते. कधीकधी मी होऊ दे जे काही होत आहे असा विचार करायची. पण कधीकधी रडत असे. त्या वेळी तो कधीकधी थांबायचा. पण नेहमीच नाही. जर तो थांबला तर तो वाईट मूडमध्ये असायचा. मला आठवतंय की तो मला बेडवरुन खाली पडत नाही तोपर्यंत लाथ मारत असे. आणि मी आमच्या रिकाम्या खोलीत जायचो आणि रात्रीसाठी दुसऱ्या खोलीत स्वतःला बंद करायचे किंवा घराबाहेर पडायचे," असा तिने खुलासा केला.
आपलं नवजात बाळही आता धोक्यात आहे समजल्यानंतर मात्र निवेटन यांना आता वेळ आली असल्याचं लक्षात आलं. त्यांना आशा होती की अँड्र्यू ग्रिफिथ्स बदलेल. "परंतु जेव्हा त्यांचे दोन आठवड्यांचे बाळ वेस्टमिन्स्टरला जाण्याच्या तयारीत होते तेव्हा सकाळी लवकर दूध मागण्यासाठी रडू लागले, तेव्हा तो जोरात बाळावर ओरडला," अशी आठवण त्यांनी सांगितली.
2006 मध्ये भावी पंतप्रधान थेरेसा यांचे चीफ ऑफ स्टाफ आणि एकेकाळी महिला हक्क कार्यकर्ते राहिलेले ग्रिफिथ्स यांना अवघ्या तीन आठवड्यात दोन महिला मतदारांना 2000 हून अधिक लैंगिकदृष्ट्या स्पष्ट संदेश पाठवल्यानंतर त्यांच्या सरकारी पदावरून काढून टाकण्यात आले. डिसेंबर 2021 मध्ये, एका कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशाने त्यांनी त्यांच्या पत्नीवर बलात्कार केला आणि वारंवार हल्ला केल्याचा निर्वाळा दिला होता.