Marathi News> विश्व
Advertisement

कोविडच्या नियमांचं पालन करण्यासाठी महिलेने काढला ड्रेस, घटना सीसीटीव्हीत कैद...

घटना सीसीटीव्हीत कैद...  

कोविडच्या नियमांचं पालन करण्यासाठी महिलेने काढला ड्रेस, घटना सीसीटीव्हीत कैद...

मुंबई : सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. पण एका महिलेने तर कोरोना नियमांचं पालन करण्यासाठी सर्वा मर्यादा ओलांडल्या आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिला सर्वांसमोर कपडे काढत कपड्यांचा मास्क म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. 

Daily Star च्या रिपोर्टनुसार आजू-बाजूला लाहन मुलं त्यांच्या पालकांसोबत आहेत, या गोष्टीचं भान देखील त्या महिलेला राहिलेलं नाही. त्यावेळी  दोन लहान मुलं त्यांच्या वडिलांसोबत जवळ असलेल्या आइसक्रीम पॉर्लरमध्ये आइसक्रीम खाण्यासाठी आल्याचं दिसत आहे. 

fallbacks

धक्कादायक घटना आइस्क्रीम पार्लरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यात एक महिला तिचा काळा ड्रेस काढून फेस मास्क म्हणून वापरताना दिसत आहे. ही घटना शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार रात्री 10.30 वाजता एका मॉलमध्ये घडली.

महिलेचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना सर्वजनिक ठिकाणी घडल्यामुळे, या घटनेची चर्चा होत आहे. जेव्हा महिला कपडे काढून त्याचा मास्क म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा त्याठिकाणी अनेक लोक होते. 

Read More