Lion Chewed Man Finger: सिंह हा असा प्राणी आहे, जो क्षणार्धात आपली शिकार फाडून टाकतो. जंगलात आणि प्राणीसंग्रहालयात जाणाऱ्या लोकांना सिंहापासून दूर राहण्यास सांगितले जाते. पिंजऱ्यात राहिल्यानंतरही हा प्राणी सर्वात धोकादायक आहे. यानंतरही काही लोक सिंहाची थट्टा करणे सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिंहासोबत पंगा घेणे त्याला महागात पडले आहे.
व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ आफ्रिकेच्या प्राणीसंग्रहालयातील आहे. एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान पिंजऱ्यात सिंह पाहिल्यानंतर त्याने त्याची थट्टा सुरू केली. सिंहाशी पंगा घेण्याची किंमत त्या व्यक्तीला चुकवावी लागली, ती आयुष्यभर लक्षात राहील. व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. जमैका प्राणीसंग्रहालयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही तो माणूस पाहू शकता. प्राणीसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आलेले सर्व लोक जेव्हा सिंहाचे फोटो काढत होते, तेव्हा ही व्यक्ती वेगळ्याच मूडमध्ये दिसली. यानंतर सिंहाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचे नाटक केले. सिंहाला त्या व्यक्तीचा हा प्रकार अजिबात आवडला नाही. त्यानंतर त्याने त्या व्यक्तीचा हात तोंडात भरला. संतप्त सिंहाने त्या माणसाचे बोट तोंडात दाबल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा धक्कादायक व्हिडिओ
Show off bring disgrace
— Ms blunt from shi born “PRJEFE” (@OneciaG) May 21, 2022
The lion at Jamaica Zoo ripped his finger off. pic.twitter.com/Ae2FRQHunk
सिंहाने माणसाचे बोट धरले
यानंतर तो माणूस आपला हात सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत राहिला, परंतु तो सिंहाच्या तोंडातून हात सोडू शकला नाही. @OneciaG नावाच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.