Marathi News> विश्व
Advertisement

उडणारा किडा की ब्रह्मकमळ? व्हायरल होणारा हा व्हिडीओ वारंवार का पाहिला जातोय?

सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असता. त्यातच हल्ली Reel प्रकरण बरंच चर्चेत असून, दर दिवशी ढीगानं रील्स व्हायरल होत असतात.. त्यातीलच हा एक व्हिडीओ   

उडणारा किडा की ब्रह्मकमळ? व्हायरल होणारा हा व्हिडीओ वारंवार का पाहिला जातोय?

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक रील्स (Reels) किंवा मग शॉर्ट्स हल्ली सर्रास मित्रमंडळींसमवेत शेअर केले जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीमध्ये एक कमाल व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांचं कुतूहल चाळवून जात आहे. या व्हिडीओमध्ये एक किडा दिसत असून, ही दृश्य पाहताना नेटकरी स्क्रीनवरील दृश्य आणखी Zoom करून पाहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

हा वारंवार पाहिला जाणारा व्हिडीओ oleg.pars नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यात एक अतिशय सुंदर आणि कथिक स्वरुपातील एक दुर्मिळ किटक पाहायला मिळत आहे. लोटस मँटिस (Lotus Mantis) असं त्याचं नाव. हा उडता किडा किंवा किटक लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे त्याची आगळीवेगळी रचना. 

प्रथमक्षणी पाहिलं असता हे हवेत उडत आलेलं एखादं ब्रह्मकमळाचं फुल वाटत आहे. तर, व्यवस्थित पाहिलं असता हा एक किडा असल्याचं लक्षात येत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'ज्यावेळी एका साधूनं लोटस मँटिसचा अर्थात पर्वतांवर असणाऱ्या फुलांवर वावरणाऱ्या किटकाचा उल्लेख केला तेव्हा तो प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा झाली. तिथं हाडं गोठवणाऱ्या थंडीवरून डोंगर चढताना सूर्यप्रकाशातून एक उडणारा किडा माझ्या हातांवर येऊन थांबला.'

बस्स... या कॅप्शनसह हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. पण, लोटस मँटिस नावाचा किटक असल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ AI पासून तयार करण्यात आल्याचं जाणकारांचं मत आहे. व्हिडीओ व्यवस्थित पाहिला असता ज्या व्यक्तिच्या हातांमध्ये किडा स्थिरावत आहे त्याच्या हातांची रचना आणि बोटांची संख्या बाहता हा व्हिडीओ एआयपासून तयार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात याविषयीची कोणतीच अधिकृत माहिती मात्र समोर येऊ शकलेली नाही त्यामुळं व्हिडीओ प्रचंड चर्चेत असला तरीही त्याच्या Authenticity ची मात्र पुष्टी करण्यात आलेली नाही. 

हेसुद्धा वाचा : उकडलेला बटाटा फ्रीजमध्ये ठेवणं आणि तो जेवणात वापरणं योग्य आहे का? तज्ज्ञ म्हणतात... 

प्रत्यक्षात लोटस मँटिस नावाचे किटक अस्तित्वात असून, त्यांची रचनाही अतिशय सुरेख रंगांमध्ये आणि फुलांच्या रचनेप्रमाणं दिसून येते. इथं दिसणारा हा उडता किडा मात्र प्रत्यक्षातील लोटस मँटिस नाही, हेच अनेकांचं मत. 

Read More