Marathi News> विश्व
Advertisement

70 वर्षीय आजोबांच्या प्रेमात पडली 28 वर्षीय तरुणी, ऑनलाइन भेट आणि थेट लग्न; लोक म्हणाले 'पैशांची लोभी...'

28 वर्षीय एक तरुणी 70 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. पण यावरुन मुलीला ट्रोल केलं जात आहे. पैशांच्या हव्यासापोटी मुलीने लग्न केल्याचा आरोप करत तिला ट्रोल केलं जात आहे. पण दोघांनी मात्र आपल्यातील प्रेम खरं असून, आपण फार आनंदी असल्याचं म्हटलं आहे.   

70 वर्षीय आजोबांच्या प्रेमात पडली 28 वर्षीय तरुणी, ऑनलाइन भेट आणि थेट लग्न; लोक म्हणाले 'पैशांची लोभी...'

28 वर्षीय एका तरुणीने आपली लव्हस्टोरी शेअर केली असून तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. तरुणीने आपण आपल्यापेक्षा वयाने 42 वर्षीय मोठ्या विदेशी व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा खुलासा केला आहे. ऑनलाइन भेट झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुललं आणि नंतर ते डेटवर जाऊ लागले. इतकंच नाही तर त्यांनी लग्नही केलं आहे. पण या नात्यामुळे मुलीला ट्रोल केलं जात आहे. मुलीने पैशांच्या हव्यासापोटी 70 वर्षीय व्यक्तीशी लग्न केल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. पण या जोडप्याने आपलं प्रेम खरं असून, आपण आपल्या आयुष्यात फार आनंदी असल्याचं सांगितलं आहे. 

ही प्रेमकहाणी 28 वर्षीय जॅकी आणि 70 वर्षीय डेव्हिड यांची आहे. 2016 मध्ये दोघांची एका डेटिंग साईटवर भेट झाली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर भेटीगाठी सुरु झाल्या. काही दिवसांतच त्यांच्या या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 

ऑनलाइन भेट झाल्यानंतर जॅकी आणि डेव्हिड यांच्यात नेहमी बोलणं होत होतं. यानंतर तीन महिन्यात डेव्हिड जॅकीला भेटण्यासाठी अमेरिकेतून फिलीपाइन्सला पोहोचले होते. येथे दोघं बरेच दिवस एकत्र होते. यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले. यानंतर डेव्हिड दर दोन महिन्यांनी जॅकीला भेटण्यासाठी फिलीपाइन्सला येऊ लागले. अखेर 208 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि जॅकी कॅलिफोर्निया येथून ओकलँड येथे शिफ्ट झाली. 

जॅकीने करोनादरम्यान लॉकडाउन लागल्यानंतर आपलं एक टिकटॉक अकाऊंट तयार केलं आणि आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. तिच्या अकाऊंटवर 50 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. युजर्स तिच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट करत असतात. काहीजण तिला लोभी म्हणत आहे, तर काहीजण शुगर गर्ल बोलत आहेत. काहींनी तर तिला अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी ग्रीन कार्ड हवं होतं, म्हणून डेव्हिडशी लग्न केलं अशा शब्दांत हिणवलं आहे. 

जॅकी आणि डेव्हिड मात्र अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करतात. डेव्हिड यांचं म्हणणं आहे की, जर दोन लोक एकमेंकावर प्रेम करत असतील आणि एकत्र आयुष्य घालवण्याची इच्छा असेल तर वय हा फक्त एक क्रमांक आहे. लोकांनी आमच्यावर टीका करण्याची गरज नाही. आम्ही दोघंही आनंदी आहोत. 

तर जॅकीने डेव्हिडबद्दल सांगितलं की, ते फार साधे आणि चांगल्या स्वभावाचे व्यक्ती आहेत. ते माझा सन्मान करतात आणि त्यापेक्षा जास्त प्रेम करतात. त्यांच्याशी लग्न केल्याचा मला कोणताच पश्चाताप वाटत नाही. 

डेव्हिड यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ते आता रिटायर्ड झाले आहेत. तसंच जॅकी नोकरी करते. त्यांच्या लग्नात जॅकीचं कुटुंब सहभागी होऊ शकलं नव्हतं. पण त्यांचं या लग्नाला पूर्ण समर्थन होतं. जॅकी आता डेव्हिडच्या कुटुंबाची काळजी घेत आहे. 

Read More