Marathi News> विश्व
Advertisement

2025 मधील पहिल्या चंद्रग्रहणाचं कसं होतं दृश्य? पाहून व्हाल थक्क!

Lunar Eclipse 2025: हे ग्रहण आज म्हणजेच 14 मार्च रोजी सकाळी 9.29 वाजता सुरू झाले आणि दुपारी 3.29 पर्यंत चालले.

2025 मधील पहिल्या चंद्रग्रहणाचं कसं होतं दृश्य? पाहून व्हाल थक्क!

Lunar Eclipse 2025: आज देशभरात होळी, धुलिवंदन साजरे करण्यात आले. प्रत्येकजण गुलालाच्या रंगात रंगलेला दिसला. दरम्यान आज होळीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहणही झाले. हे ग्रहण आज म्हणजेच 14 मार्च रोजी सकाळी 9.29 वाजता सुरू झाले आणि दुपारी 3.29 पर्यंत चालले.

ब्लड मून

विशेष म्हणजे यावेळी चंद्रग्रहणामुळे चंद्र ब्लड मूनसारखा दिसला. याचा अर्थ चंद्राचा रंग लाल झाला. या काळात गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

भारतातही चंद्रग्रहण दिसले का?

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो परंतु हे ग्रहण भारतात दिसले नाही. म्हणून सुतक काळ वैध राहत नाही. असे असले तरी ग्रहणाच्या वेळी देवाचे नाव घेणे आणि तुळशी घालून अन्न सुरक्षित ठेवणे शुभ मानले जाते,  अशी धार्मिक श्रद्धा आहे. 14 मार्च रोजी म्हणजेच होळीच्या दिवशी एक खगोलीय घटना दिसून आली. कारण हे वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण आहे. आज चंद्र लाल होईल. म्हणूनच चंद्राला 'ब्लड मून' म्हणतात.

पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे काय?

जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या अगदी मध्ये येते तेव्हा पूर्ण चंद्रग्रहण होते. यामुळे चंद्र लाल किंवा अस्पष्ट दिसतो. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र अदृश्य होत नाही तर फक्त लाल होतो.

चंद्रग्रहण कधी आणि कुठे दिसले?

हे ग्रहण अमेरिका, पश्चिम युरोप आणि अटलांटिक महासागरातील लोकांना दिसेल. भारतातील लोक चंद्रग्रहण पाहू शकले नाहीत.

Read More