Marathi News> विश्व
Advertisement

Weird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल

Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल... 

Weird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल

Masaai Tribe Wedding Rituals: माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला समाजात लोकांमध्ये राहणे आवडते. प्रत्येक समाजाची स्वतःची संस्कृती, काही परंपरा आणि काही श्रद्धा असतात. ज्या त्या समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाळल्या पाहिजेत. यामध्ये काही परंपरा पटतात तर काही परंपरांची चीड येत. असाच एक देश आहे, जिथे लग्न झालेल्या नवरीला निरोप देताना वडिलांना जे करावं लागतं ते ऐकून तुम्हालाही चीड येईल. साधारणपणे प्रत्येक समाजात लग्न बघितले जाते. जसे की महाराष्ट्रात लग्न लागून सासरी चाललेल्या मुलगी बाप आणि आईला मिठी मारते. यानंतर नवऱ्याच्या गाडीत सोडत तिला निरोप दिला जातो. मात्र या घटनेतील प्रथा इतक्या विचित्र आहेत की त्याबद्दल ऐकून तुमचे होश उडतील. 

केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे लग्न लावून झालेल्या मुलीला सासरी पाठवताना बाप मुलीवर थुंकून त्यानंतरच तिला सासरी पाठवले जाते. वडील घरापासून दारापर्यंत तिच्या डोक्यावर थुंकतात. केनिया आणि टांझानियामध्ये मसाई नावाची जमात अशा विचित्र परंपरेवर विश्वास ठेवतात. मसाई जमातीच्या लोकांना निरोप देताना केला जाणारा हा सर्वात खास विधी आहे. हे प्रत्येक पित्याला करावेच लागते. या परंपरेला तिथे वडिलांचा आशीर्वाद समजला जातो.

डोक्यावर थुंकणे म्हणजे वडिलांचा आशीर्वाद

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जमातीचे लोक मुलीचा निरोप घेताना डोक्यावर थुंकणे हा वडिलांचा आशीर्वाद मानतात. जर या विधीत वडिलांनी डोक्यावर थुंकले नाही तर असे मानले जाते की त्यांनी आपल्या मुलीला आशीर्वाद दिला नाही, अशी विचित्र प्रथा आहे. 

Read More