Major Oil And Natural Gas Deposit Reserve Discovery In China : चीनमध्ये निळ्या आणि काळ्या सोन्याचा अति प्रचंड खजिना सापडला आहे. हे निळ आणि काळ सोनं म्हणजे तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत. या साठ्यांमुळे नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढेल आणि चीनचा ऊर्जा पुरवठा स्थिर होईल. रोज उत्खनन केले तरी हा साठा संपणार नाही. हा अति प्रचंड खजिना पाहून चीन देखील आश्चर्यचकित झाला आहे.
बेईबू बेसिनमधील पॅलेओझोइक टेकड्यांमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडल्याची माहिती चीनच्या सरकारी मालकीच्या तेल आणि वायू कंपनीने दिली. यना नॅशनल ऑफशोअर ऑइल कॉर्पोरेशन (CNOOC) ने गुरुवारी एका निवेदन जारी केले. या निवेदनात या साठ्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सरासरी 121 फूट म्हणजेच 32 मीटर पाण्याची खोली असलेल्या क्षेत्रात सुमारे 15,879 फूट खोलीपर्यंत खोदकाम केल्यानंतर हा शोध लागला. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने चीनसाठी हा शोध महत्त्वाचा आहे. याशिवाय, वायू आणि तेलाचा हा साठा चीनच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देणार आहे.
चिनी कंपनी CNOOC ने बेइबू बेसिनमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे शोधले आहेत. हे साठे इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की दररोज सुमारे 13.2 दशलक्ष घनफूट नैसर्गिक वायू आणि 800 बॅरल कच्चे तेल काढू शकतात. या शोधामुळे बेईबू बे बेसिनमध्ये तेल आणि वायूचे आणखी साठे सापडू शकतात. टेकड्यांमध्ये दफन केलेले साठे शोधण्यासाठी सतत काम केले जात असल्याची माहिती सीएनओओसी भूगर्भशास्त्रज्ञ चांगगुई यांनी दिली.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये CNOOC ने मध्य बोहाई खाडीतील बोझोंग 26-6 तेलक्षेत्र विकास प्रकल्प (फेज I) पासून उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पातून 2025 मध्ये दररोज 22,300 बॅरल तेलाचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. बोझोंग 26-6 तेलक्षेत्र हे जगातील सर्वात मोठे पर्वतीय तेलक्षेत्र आहे,यात 200 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त तेल आणि वायू आहे.