Marathi News> विश्व
Advertisement

मृत्यूचं फ्लाईंग किस, नेमकं काय असतं? पाहा हा थरकाप उडवणारा VIDEO

अशा प्रसंगांमध्ये मृत्यू कधी समोर उभा राहील सांगताही येत नाही.   

मृत्यूचं फ्लाईंग किस, नेमकं काय असतं? पाहा हा थरकाप उडवणारा VIDEO

नवी दिल्ली : एखादं पर्वत सर करण्यासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकाच्या डोक्यात बऱ्याच गोष्टींचा काहूर माजलेला असतो. बहुतांश गिर्यारोहक वातावरण, गिर्यारोहणाचं ठिकाण आणि त्याच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती ठेवून असतात. पण, बऱ्याचदा अशा प्रसंगांमध्ये मृत्यू कधी समोर उभा राहील सांगताही येत नाही. 

मुळात जगणं किती क्षणिक आहे, असंच हे प्रसंग शिकवून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जिथे 'मृत्यूची फ्लाईंग किस' म्हणजे नेमकं काय, याचा सहज अंदाज येत आहे. 

हे नेमकं काय प्रकरण आहे, तुम्हालाही प्रश्न पडतोय ना? 

itshimalayas या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जिथे, पाकिस्तानधील (Spantik) या 7 हजार फुटांवर असणाऱ्या बेसवर डोंगरमाध्यावरून एक मोठाला दगड गटांगळ्या खात खाली आला. 

तीव्र उतार असल्यामुळं हा दगड अतिशय वेगानं खाली आला आणि वाटेत असणाऱ्याच्या इतक्या जवळून गेला, जणू मृत्यूच त्याला स्पर्शून गेला. 

दगडाच्या कचाट्यात तो व्यक्ती अडकला नसला तरीही काही क्षणांसाठी हा व्हिडीओ पाहताना काळजात चर्रsss होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Itshimalayas (@itshimalayas)

2018 मधील हा व्हिडीओ असल्याचं कॅप्शनमधून कळत आहे. मुळात व्हिडीओ कितीही जुना असला तरीही त्यामुळं गिर्यारोहक, शेर्पा ही सर्व माणसं सतत आपला जीव कशा पद्धतीनं धोक्यात टाकत असतात हे लक्षात आलं. 

शिवाय अगाध लीला दाखवत निसर्ग कायमच आपल्याला थक्क करतो, भारावतो. पण, हाच निसर्ग जेव्हा आपला थरकाप उडवतो तेव्हा नेमकं काय होतं, हेच हा व्हिडीओ दाखवून देत आहे.  

Read More