Marathi News> विश्व
Advertisement

अमेरिकेत धक्कादायक घटना, 11 कृष्णवर्णीयांवर गोळीबार; 10 जणांचा मृत्यू

Man Opens Fire On People In New York: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हल्लेखोराने एक भयानक कृत्य केले आहे. 

अमेरिकेत धक्कादायक घटना, 11 कृष्णवर्णीयांवर गोळीबार; 10 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : Man Opens Fire On People In New York: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हल्लेखोराने एक भयानक कृत्य केले आहे. न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये हल्लेखोरांना अंदाधुंद  गोळीबार करत 11 लोकांना जखमी केले. (New York Firing) यातील 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 न्यूयॉर्कमध्ये सुपरमार्केटमध्ये एका व्यक्ती घुसली. त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यात सुरुवात केली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने 13 जणांना गोळ्या घातल्या, त्यापैकी 11 कृष्णवर्णीय आहेत. न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी अनेक जणांवर गोळीबार करण्यात आल्याने एकच खबराट निर्माण झाली. पोलिसांनी सांगितले की, बंदूकधारी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले की, बफेलो येथील एका सुपरमार्केटमधील घटनेबाबत ती अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. अधिकाऱ्यांने सांगितले की, एक संशयित, जो प्राणघातक हल्ला करण्यासाठी रायफलने सज्ज होता. शनिवारी दुपारी हल्ला करण्यासाठी तो न्यूयॉर्क काउंटीमधील त्याच्या घरापासून काही तास दूर बफेलो येथे आला होता.

संशयिताचे नाव अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याचे वय 18 वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हल्ल्याच्या वेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रे होती.

Read More